आपल्या सर्वांच्या घरात प्लास्टिकचे फर्निचर असते. त्यामुळे खुर्च्या असो किंवा टेबल प्लास्टिकच्या विकत घेतो. पण अन्य फर्निचर प्रमाणे प्लास्टिकचे फर्निचर स्वच्छ करणे फार गरजेचे आहे. प्लास्टिकच्या फर्निचरवर जेव्हा धुळ जमा होतो तेव्हा त्याची चमक निघून जाते.
आपण सर्वजण प्लास्टिकचे फर्निचर स्वच्छ करतो. पण यावेळी काही चुका करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुमच्या प्लास्टिकच्या फर्निचरचे नुकसान होऊ शकते.
-अधिक केमिकलचा वापर करणे
क्लिनिंगसाठी आपण काही प्रकारच्या केमिकलचा वापर करतो. आपल्याला असे वाटते की, या केमिकल्सच्या मदतीने स्वच्छता करणे अगदी सोप्पे होईल. पण वास्तवास हार्श केमिकलचा वापर केल्याने प्लास्टिकच्या फर्निचरला नुकसान पोहचू शकते. या फर्निचरचा रंग बदलू शकतो. त्यामुळे नेहमीच माइल्ड क्लिनरचा वापर करावा.
-स्क्रबरचा वापर करावा
प्लास्टिकच्या फर्निचरवर धूळ जमा होते. त्यामुळे ती लवकर स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. पण प्लास्टिकचे फर्निचर क्लिनिंग करताना स्कोअरिंग पॅड किंवा स्टील वूलचा वापर करू नये. यामुळे प्लास्टिकच्या सरफेसवर स्क्रॅच येऊ शकतात.
-दररोज स्वच्छता न करणे
प्लास्टिकचे फर्निचर क्लिनिंग करताना अत्यंत गरजेचे आहे की, आपण ते दररोज स्वच्छ करावे. असे न केल्याने त्यावर धूळ जमा होईल आणि नंतर ती स्वच्छ करणे मुश्किल होईल.
-फर्निचर धुतल्यानंतर लगेच उन्हात ठेवणे
काही वेळेस असे होते की, जेव्हा प्लास्टिकचे फर्निचर स्वच्छ करतो तेव्हा ते सुकण्यासाठी आपण उन्हात ठेवतो. असे केल्याने त्याचा रंग फिका पडतो. त्याचसोबत ते मजबूत होत नाही.
-ब्लीचचा अधिक वापर करणे
बहुतांशवेळा आपण प्लास्टिक फर्निचर स्वच्छ करण्यासाठी ब्लीचचा वापर करतो. पण असे करणे टाळले पाहिजे. ब्लीचचा गरजेपेक्षा अधिक वापर करणे नुकसानदायक ठरू शकते.
हेही वाचा- घर साफ करताय, मग बेड खालचा पसारा आवरा असा