सध्याच्या इंस्टंट जमान्यात खाण्यापिण्याच्या पदार्थांपासून सगळंच इंन्स्टंट झाले आहे. यामुळे जे झटपट खाता येतील आणि झटपट स्वच्छ करता येतील अशा पदार्थ आणि वस्तूंना मागणीही वाढत आहे. विशेष करून या झटपट स्वच्छ करता येणाऱ्या वस्तूंमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक असलेले प्लास्टीक पहील्या क्रमांकावर आहे. यामुळे जर तुम्हीही प्लास्टीकच्या टिफीनमधून जेवण नेत असाल तर वेळीच सावध व्हा.
कारण प्लास्टीक वस्तू बनवण्यासाठी जी रसायन वापरण्यात येतात त्यापासून कॅन्सर होण्याचा धोका असतो.
आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या वापराच्या वस्तूंमद्ये प्लास्टीक असतेच. खिशाला परवडणारे आणि दिर्घकाळ टिकण्याबरोबर स्वच्छ करायला सोपे असल्याने प्लास्टीकचा टिफीन, बाटली ,पॅकेजिंग बॉक्स अशा वस्तू प्रत्येकजण वापरत असते. प्लास्टिक रसायनांपासून बनवलेले असल्याने त्यात ठेवलेले खाद्यपदार्थ किंवा पाणी त्याच्या संपर्कात आल्यानंतर ते विषारी बनते. गरम पदार्थ त्यात ठेवल्यास पदार्थात प्लास्टीकचे सूक्ष्म कण मिसळू शकतात. तो पदार्थ खाल्यावर थेट पोटात जातो. अशा प्रकारे प्लास्टीक आपल्या रक्तात मिसळते.
प्लास्टिक उत्पादनांमध्ये – BPA (Bisphenol A) हे रसायन आढळते. त्यामुळे हार्मोनल असंतुलन, प्रजनन आरोग्य आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
PHTHALATES नावाचे रसायन प्लास्टिकला लवचिक बनवते जे लहान मुलांसाठी हानिकारक देखील असू शकते.
प्लॅस्टिक टिफिन आणि बाटल्यांमुळे कालांतराने अन्न आणि पाण्यात विचित्र चव आणि वास येऊ शकतो, ज्यामुळे अन्न खराब होते.
त्यामुळे प्लास्टिक टिफिन वापरण्याऐवजी स्टील किंवा काचेचा टिफिन वापरावा. तसेच प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिऊ नये.