घरलाईफस्टाईलढोली तारो म्हणतं वजन घटवा

ढोली तारो म्हणतं वजन घटवा

Subscribe

रास गरबा आणि दांडीया खेळल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ढोली तारो म्हणतं तुमचे वजन घटवा

नवरात्र म्हटल की, रास गरबा आणि दांडीया आलाच. दांडिया हा नवरात्रमधील सर्वात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग मानला जातो. दांडिया किंवा रास गरबा खेळून आनंद मिळतोच. मात्र त्यासोबत तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होते. गरब्याचा आनंद घेताना तुम्हाला बरेच फायदे देखील होतात. प्रत्यक्षात, गरबा नृत्य शैली हा संपूर्ण शरीर व्यायाम आहे. गरबा खेळल्याने वजनच कमी होत नाही तर अनेक रोग देखील बरे होण्यास मदत होते.

कंबर बारीक होते

जर तुमची कंबर मोठी असेल आणि ती तुम्हाला बारीक करायची असल्यास गरबा हा तुमच्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. गरबा खेळल्याने कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

तणाव दूर होतो

गरबा खेळल्याने आनंद मिळतोच त्यासोबत तुमचा तणाव देखील दूर होण्यास मदत होतो. गरब्यातील संगीताच्या तालावर नाचताना मेंदूमध्ये चांगले संप्रेरक सोडले जातात आणि त्यामुळे मेंदूचा ताण कमी होतो.

वजन कमी होते

वजन कमी करण्यासाठी २० मिनिटे जरी गरबा खेळला तर सुमारे २५० ते ३०० कॅलरी जळून जातात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तर ४० मिनिटे गरबा खेळल्यास ५०० कॅलरीज बर्न होतात.

- Advertisement -

शरीर लवचिक होण्यास मदत

गरबा खेळल्यामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते. गरबा खेळ्यामुळे हातापासून पायापर्यंत तर हातापासून डोक्यापर्यंत व्यायाम होतो. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायम होऊन शरीर लवचिक होते.

स्मरणशक्ती चांगली राहते

गरबा हा सर्व वयातील व्यक्तींकरता फायद्याचा ठरतो. परंतु ३५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींने गरबा खेळल्यास त्यांची स्मरणशक्ती चांगली राहते.

आत्मविश्वास वाढतो

गरबा खेळल्याने आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. त्यासोबत मन देखील आनंदी राहते. गरबा खेळल्यामुळे नकारात्मक भावना दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते.

हार्टसाठी देखील फायदेशीर

गरबा खेळणे हे हार्टसाठी फायदेशीर आहे. गरबा खेळल्यामुळे कार्डिओचा व्यायाम होतो. या व्यायामामुळे फुफ्फुसाच्या कार्यामध्ये देखील सुधारणा होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -