घरलाईफस्टाईलखमंग पोहा कटलेट

खमंग पोहा कटलेट

Subscribe

चविष्ट पोहा कटलेट.

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खमंग आणि चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • चार बटाटे
  • १ कप भिजवलेला पोहा
  • १ चमचा मसाला
  • १ चमचा जिरा पावडर
  • १ चमचा चाट मसाला
  • बारीक चिरलेल आलं
  • बारीक चिरलेली मिरची
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • गरजेनुसार तेल

कृती

सर्वप्रथम उकडलेले बटाटे चांगले स्मॅश करुन घ्यावे. त्यात पोहे, मीठ, मसाला, जिरं, चाट मसाला, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. त्यानत हाताला थोडे तेल लावून त्याचे कटलेट करुन घ्यावे. त्यानंतर पॅनमध्ये तेल घालून चांगले खरपूस भाजून घ्यावे. अशाप्रकारे झटपट पोह्याचे कटलेट तयार. हे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -