महिलांमध्ये PCOS ची समस्या आजच्या काळात खूप सामान्य झाली आहे. PCOS हा अंतःस्रावी विकार आहे. आजकाल प्रत्येक दुसरी महिला या समस्येने त्रस्त आहे. PCOS मध्ये पीरियड्स अनियमित असू शकतात. यामध्ये मासिक पाळी कमी-जास्त दिवस असू शकते. जेव्हा मासिक पाळी अनियमित असते तेव्हा ते पीसीओएस किंवा पीसीओडीचे लक्षण मानले जाते, परंतु मासिक पाळी नियमित असली तरीही तुम्ही या समस्येला बळी पडू शकता का?
- पी.सी.ओ.एस. म्हणजे काय? (PCOS)
पॉलीसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (पीसीओएस) ही महिलांमध्ये प्रजननक्षमतेच्या अंतःस्रावी समस्या आहे. आजकाल सुमारे ५-१०% तरुण स्त्रिया या समस्येने त्रस्त असून, गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण करतात. पीसीओएसग्रस्त महिलांना अनियमित मासिक पाळी, केसांची असामान्य वाढ, मुरुमं तसेच ओवेरीयन सीस्ट म्हणजे गर्भाशयात गाठ येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.
पी.सी.ओ.एस ची लक्षणे पुढीलप्रमाणे-
- चेहऱ्यावर पुरळ येणे-
पुरळ येणे ही महिलांची सामान्य समस्या आहे. परंतू अधूनमधून पुरळ येणे ही वेगळी गोष्ट आहे. पण जर तुम्हाला पीसीओएसची समस्या असेल तर मुरुमे अधिक येऊ शकतात. त्यामुळे त्वचेच्या काळजीपूर्वक निगा राखली पाहिजे. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करणे.
- चेहऱ्यावर डार्क केस येणे-
PCOS मध्ये शरीरात एंड्रोजन हार्मोन्सचे प्रमाण वाढत असते आणि त्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर नको असलेले केस येतात. तसेच हे केस अतिप्रमाणात येत असल्यास हे लक्षण PCOSचे असू शकते.
- सतत केस गळणे-
केस गळतीच्या गोळ्या घेऊनही जर केस गळत असतील तर ते PCOSचे लक्षण होऊ शकते. अशातच केसांवर जर कंट्रोल राहत नसेल तर PCOS ची समस्या मोठयाप्रमाणत उद्भवू शकते.
- वजनात बदल-
सतत जर वजनामध्ये बदल जाणवत असतील तर हे PCOSचे लक्षण आहे. अचानक वाढणारे वजन त्याचबरोबर कमी होणारे वजन हे जर सातत्याने होत असल्यास यावर लगेच उपचार करावा.
- शरीरातील काही भाग काळे पडणे-
जर शरीरातील मान,हाताचे कोपरे आणि गुडघा सारखे काळे पडत असतील तर हे PCOSचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करता काम नये. कारण यामुळे अनेक गडद काळेपणा शरीरावर येत राहणार आणि त्वचेची समस्या उद्भवणार.
हेही वाचा :