चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण विविध ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर कतो. या प्रोडक्ट्समध्ये काही वेळेस केमिकलचा वापर केला जातो. जे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.
अशातच चेहऱ्याची त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसण्यासाठी पोर्स क्लिन करणे अत्यंत गरजेचे असते. बहुतांशवेळा हवेतील धुळ आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे पोर्स अस्वच्छ होतात. यासाठी तुम्ही काही घरगुती वस्तूंचा वापर करून पोर्स स्वच्छ करू शकता.
पोर्स स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला केवळ दही आणि कॉफी पावडरचा वापर करायचा आहे. खरंतर दही चेहऱ्याला लावल्याने तुमची त्वचा उजळ होते. त्यासोबत त्वचेवर दिसणारे एजिंग साइन्स ही कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त कॉफी पावडरचा वापर केल्यास त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत होते. तसेच कॉफीमुळे डेड स्किन निघून जाते.
पोर्स स्वच्छ करण्यासाठी काय कराल?
सर्वात प्रथम एका बाउलमध्ये 2-3 चमचे दही टाका
आता त्यात अर्धा चमचा कॉफी टाका आणि दोन्ही गोष्टी एकत्रित मिक्स करा
आता हलक्या हाताने किंवा ब्रशने चेहऱ्यावर लावा
चेहऱ्यावर लावून झाल्यानंतर स्क्रब मसाज करा
जवळजवळ 10 मिनिटे तरी हा पॅक चेहऱ्यावर लावून ठेवा
त्यानंतर पाणी आणि कॉटनच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा आणि नॉर्मल स्किन केअर करा
अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा या स्क्रबचा वापर करू शकता
हेही वाचा- चेहऱ्यावरील ब्लाइंड पिंपल्स असे करा दूर