Saturday, April 17, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Covid-19: कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये वाढतोय डायबेटीसचा धोका

Covid-19: कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये वाढतोय डायबेटीसचा धोका

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून कोरोना रुग्णाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आतापर्य़ंत १ कोटी २० लाखाहून अधिकजणांना संसर्ग झाला आहे. पण त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांना डायबेटीस होत असल्याचेही समोर आले आहे. नुकत्याच अमेरिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब निदर्शनास आली आहे.

अमेरिकेत कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना प्रकृतीविषयक अनेक तक्रारी होत्या. यामुळे कोरोनाग्रस्त झालेल्या ३७००० रुग्णांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात जवळजवळ १४ टक्के कोरोनाग्रस्तांच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याचे आढळले. तर कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना टाईप-ए, आणि टाईप-बी डायबिटीज झाल्याचे समोर आले. यामुळे तज्त्रांनी कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना तब्येतीवर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण कोरोनामध्ये रुग्णांना प्रचंड अशक्तपणा जाणवतो. सुस्ती येते. पण हीच लक्षणे डायबेटीसचीदेखील आहेत. यामुळे बऱ्याचवेळा कोरोनामुक्त झालेली व्यक्तीला आजारपणामुळे थकवा व अशक्तपणा आला असावा असे वाटते. पण तो डायबेटीसदेखील असू शकतो.

- Advertisement -

यामुळे डायबेटीसची कोणती लक्षणे आहेत जाणून घेऊया

सतत तहान व भूक लागणे

जर पोट भर खाल्यानंतरही तुम्हांला सतत भूक लागत असेल. तहानेने घसा कोरडा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन चाचणी करून घ्यावी.

शरीरावरील जखम बरेच दिवस न भरणे

- Advertisement -

जर शरीरावरील एखादी जखम किंवा व्रण बरेच दिवस भरत नसेल तर डायबेटीसची चाचणी करून घ्यावी. कारण शरीरात ग्लुकोजचे प्रमाण सामान्य असेल तर कुठलीही जखम लवकर भरते. पण डायबेटीस असल्यास जखमा लवकर भरत नाहीत.

वारंवार लघवीला जावे लागणे

वारंवार लघवीला जावं लागत असेल तर रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याचा तो संकेत आहे हे समजावे.

डोळ्यांना अस्पष्ट दिसणे

अस्पष्ट दिसू लागणे हे देखील डायबेटीसचे एक लक्षण आहे.

हात पाय सुन्न होणे

जर तुमचेही हात पाय अचानक सुन्न होत असतील तर वेळीच सावध व्हा. डायबेटीसच्या अनेक लक्षणांपैकी हात पाय सुन्न होणे, त्यातील संवेदना न जाणवणे हे देखील एक लक्षण आहे.


तुमचा रक्त गट कोणताय? ‘या’ रक्तगटाच्या लोकांना Diabetes चा धोका सर्वाधिक!
- Advertisement -