औषधं न घेताही पाळी पुढे ढकलण्याचे नैसर्गिक उपाय

महिला पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खातात. पण या गोळ्यांचे साईड इफेक्टसही आहेत.

धार्मिक कार्यक्रम असेल किंवा कधी लांबचा प्रवास करायचा असेल अशावेळी महिलांना एकच समस्या अधिक भेडसावते ती असते मासिक पाळीची. मग महिला पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खातात. पण या गोळ्यांचे साईड इफेक्टसही आहेत. जे भविष्यात आजारांना आमंत्रण देऊ शकतात. हे टाळण्यासाठी काही नैसर्गिक उपायही करता येतात.

सफरचंदाचा रस (​Apple Cider Vinegar)
पाळी पुढे ढकलायची असेल तर त्यासाठी सफरचंदाचा रस हे उत्तम औषध आहे. गरम पाण्यात एक टेबल स्पून सफरचंदाचा रस Apple Cider Vinegar घ्यावा. प्रामुख्याने पाळीच्या १० ते १२ दिवसांआधीपासूनच हा रस घ्यावा.सफरदचंदाच्या रसामुळे पोट फुगणे , पोटात कळ येणे यापसून आराम मिळतो.

लिंबाचा रस
सफरचंदाप्रमाणेच लिंबाचा रस गरम पाण्यातून घेतल्यास पिरियड्स उशीरा येतात. तसेच ब्लीडींगही नियंत्रित होते.

मुलतानी माती
पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी मुलतानी मातीही फायदेशीर असते. त्यासाठी २५ ते ३० ग्रॅम मुलतानी माती गरम पाण्यातून घ्यावी. पाळीच्या तारखेच्या एक आठवड्याआधी हे पेय घ्यावे. यामुळे कुठलेही साईड इफेक्ट्स न होता पाळीची तारीख पुढे जाते.

 

काकडी
काकडीच्या थंड गुणधर्मामुळे पिरियड्स उशीरा येण्यास मदत होते. यासाठी पाळीच्या तारखेच्या एक आठवड्याआधीपासूनच काकडीसारख्या थंड पदार्थांचे सेवन करणे सुरू करावे.