चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला अनेक स्किनकेर रुटीन फॉलो करतात किंवा पार्लरला जाऊन फेस पॅक किंवा इतर गोष्टी करून येतात. परंतु तुम्ही तुमचा हा खर्च वाचवू शकता. तुम्ही स्वयंपाकघरात ठेवलेल्या बटाटे आणि टोमॅटोच्या मदतीने तुम्ही तुमची स्किन ग्लोइंग बनवू शकता. आज आपण जाणून घेऊयात बटाटे आणि टोमॅटो ज्यूसने आपली स्किन कशी ग्लोइंग आणि परफेक्ट बनेल.
बटाट्याचा रस
त्वचेसाठी फायदेशीर
बटाट्यामध्ये भरपूर गुणधर्म असतात आणि त्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात. हे सर्व गुणधर्म त्वचेची चमक वाढवण्यास, काळे डाग दूर करण्यास, तसेच सनबर्न आणि पिग्मेंटेशन हलके करण्यास मदत करतात.
काळे डाग आणि पिगमेंटेशनसाठी बटाट्याचा रस वापरा
- बटाटा किसून त्याचा रस काढा.
- काळे डाग असलेल्या ठिकाणी ते लावा.
- 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
- हा उपाय आठवड्यातून 3- वेळा करा.
त्वचेला हायड्रेट करण्यासाठी बटाटा आणि मधाचा फेस पॅक
- 1 चमचा मध 2 चमचे बटाट्याच्या रसात मिसळा.
- ते चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा आणि थंड पाण्याने धुवा.
- आठवड्यातून 2-3 वेळा वापरा.
त्वचा उजळवण्यासाठी बटाटा आणि लिंबाचा रस
- 1 चमचा बटाट्याचा रस अर्धा चमचा लिंबाच्या रसात मिसळा.
- ते कापसाच्या पॅडच्या मदतीने त्वचेवर लावा आणि 10-15 मिनिटांनी पाण्याने धुवा.
- आठवड्यातून 2 वेळा वापरा.
टोमॅटोचा रस
टोमॅटोमध्ये लायकोपीन, व्हिटॅमिन ए आणि नैसर्गिक आम्ल भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय, त्वचेसाठी फायदेशीर असे अनेक गुणधर्म आहेत. टोमॅटोचा रस त्वचेतील छिद्रे घट्ट करण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतो, तसेच टॅनिंग आणि मुरुमे कमी करतो.
छिद्रे घट्ट करण्यासाठी टोमॅटोचा रस वापरा
ताज्या टोमॅटोचा रस काढा आणि कापसाच्या बॉलने थेट त्वचेवर लावा. 1०-15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून 3-4 वेळा वापरा.
चमकदार त्वचेसाठी टोमॅटो आणि दह्याचा फेस मास्क
1 चमचा दही 2 चमचे टोमॅटोच्या रसात मिसळा.
ते चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या.
यानंतर कोमट पाण्याने धुवा.
हे आठवड्यातून 2-3 वेळा लावा.
हेही वाचा : Beauty Tips : हे फेस पॅक चेहऱ्यावर लावणे टाळावे
Edited By : Prachi Manjrekar