Monday, January 20, 2025
HomeमानिनीPotato peels for cleaning : बटाट्याची साल फेकून देताय?

Potato peels for cleaning : बटाट्याची साल फेकून देताय?

Subscribe

बटाटा पौष्टीक असल्याने त्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. बटाट्यापासून तयार होणारे आलू पराठे, फ्रेंच फ्राइस, चिप्स सर्वजचण आवडीने खातात. आपण बटाटे वापरताना त्याची साल कित्येकदा फेकून देतो. पण, याच सालीपासून तुम्ही घरातील अनेक गोष्टी स्वच्छ करू शकता. आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालींपासून घराची साफसफाई कशी करता येईल याच्या काही टिप्स देणार आहोत. बटाट्याचा सालींचा वापर साफसफाईसाठी कसा करावा, हे जाणून घेऊयात,

आरसे – 

आरसे स्वच्छ करण्यासाठी बटाट्याची साल तुम्हाला वापरता येतील. बटाट्याच्या सालींमधील गुणधर्म काचेवरील डाग स्वच्छ करण्यासाठी उपयोगी पडतात. यासाठी बटाट्याची साल तुम्हाला डायरेक्ट काचेवर चोळावी लागेल किंवा बटाट्याचा रसही वापरता येऊ शकतो.

शुजची दुर्गंधी – 

शुजला वारंवार स्वच्छ करूनही दुर्गंधी येत असेल तर रात्रभर शुजमध्ये बटाट्याच्या साली टाकून ठेवा आणि सकाळी बटाट्याची साल फेकून द्या. शुजमधील दुर्गंधी निघून जाईल.

प्लास्टिकची भांडी –

प्लास्टिकच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी तुम्हाला उकळलेल्या पाण्यात बटाट्यांच्या साली टाकाव्या लागतील. या ट्रिकमुळे प्लास्टिकच्या भांड्यावरील डाग सहजतेने निघतील.

गंज लागलेली भांडी –

गंज लागलेल्या भांड्यात चिमूटभर मीठ टाका आणि यानंतर बटाट्याच्या सालीने भांडी स्वच्छ करा. यानंतर भांडे स्वच्छ पाण्याने धुवून टाका. तुम्हाला गंज लागलेली भांडी स्वच्छ झालेली दिसतील.

चांदीची भांडी –

चांदीच्या भांड्यांची साफसफाई करण्यासाठी तुम्हाला बटाट्याच्या सालींचा वापर करता येईल. यासाठी भांड्यावर बटाट्याची साले घासा आणि 5 ते 10 मिनिटांनी भांडी कापडाने पुसून घ्या. या ट्रिकमुळे चांदीच्या भांड्यांवरील डाग सहजतेने नाहीसे होतील.

काचेची भांडी – 

काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी बटाट्याची साले पाण्यात भिजत ठेवा. तयार पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या आणि स्प्रे बॉटलमधील पाणी काचेच्या भांड्यावर मारावे आणि यानंतर काचेच्या वस्तू कापडाने पुसून घ्या.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini