Monday, December 2, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीचिरतरुण राहण्यासाठी लावा या सवयी

चिरतरुण राहण्यासाठी लावा या सवयी

Subscribe

स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच चिरतरुण राहायचे आहे. यासाठी वाढते वय लपविण्यसाठी प्रत्येकजण धडपडत आहे अर्थात वयापेक्षा लहान दिसायचं आहे. पण आपण पाहिले असेल की, काहीजण वयापेक्षा मोठे दिसतात. तर काहीजण 10 वर्षांनी लहान दिसतात. अर्थात यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये त्वचेची योग्य काळजी, हार्मोनल असंतुलन, स्ट्रेस आणि आरोग्याच्या परिस्थितीचा समावेश असू शकतो. अशावेळी काही आरोग्यदायी सवयी तुम्हाला चिरतरुण राहण्यास मदत करतात.

सकाळचा सूर्यप्रकाश – सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे सूर्यप्रकाश अवश्य घ्यावा. सूर्यप्रकाशात चालावे किंवा थोडा वेळ बसले तरी चालेल. यामुळे कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी संतुलित राहते. याशिवाय शरीराला सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन-डी मिळते आणि त्वचेलाही फायदा होतो.

- Advertisement -

अनुलोम-विलोम – निरोगी राहण्यासाठी योगा आणि व्यायामाचा रुटीनमध्ये अवश्य समावेश करावा. जर तुम्हाला तुमच्या खऱ्या वयापेक्षा तरुण दिसायचं असेल तर त्यासाठी दररोज अनुलोम विलोम करा. यामुळे स्ट्रेस कमी होईल आणि शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह वाढेल.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या – तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक असते. यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि जळजळ कमी होते. त्यामुळे रोज सकाळी उठून तांब्याच्या भांड्यात सुमारे 300 मिली पाणी टाकावे आणि ते पाणी दिवसभर प्यावे.

- Advertisement -

पौष्टिक आहार – आहारात नेहमी हिरवा भाजीपाला, ऋतुमानानुसार फळे तसेच दुधाचा समावेश करावा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळून त्वचेलाही पोषण मिळते. प्रोटिन्सयुक्त नाश्ता करा. सकाळी तुम्ही हेल्दी फॅट्स आणि शेंगदाणे पाहू शकता. हे शरीराला प्रोटिन्स प्रदान करतात.

व्यायाम – सुदृढ आरोग्यसाठी आणि चिरतरुण दिसण्यासाठी जसा शरीरासाठी व्यायाम महत्वाचा आहे तसाच चेहऱ्याच्या त्वचेसाठी व्यायाम महत्वाचा आहे. यासाठी तुम्ही इंग्रजी अक्षर ‘इ’ आणि ‘ओ’ बोलण्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा व्यायाम उम्मतरित्या होईल. ही प्रक्रिया 5 ते 7 मिनिटे करा. याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

 

 

 


हेही वाचा : चमकदार चेहऱ्यासाठी अननस फेस मास्क फायदेशीर

 

- Advertisment -

Manini