Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthप्रदूषणातही फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी करा प्राणायम

प्रदूषणातही फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी करा प्राणायम

Subscribe

शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच आरोग्य धोक्यात आले असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या श्वसनसंस्थेवर होत आहे. त्यामुळे या काळात फुफ्फुसाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. पण फक्त अँटीबायोटीक औषधं घेऊन फुफ्फुसं निरोगी ठेवणे शक्य नसून प्रदूषणाशी लढण्यासाठी प्राणायाम ही नैसर्गिक आणि प्रभावी पद्धतीही तेवढीच आवश्यक आहे.

विशेष करून प्राणायामामुळे फक्त श्वसनाशी संबंधित आजार दूर होत नाहीत तर तणावही कमी होतो. तसेच श्वसनसंस्थाही मजबूत होते. त्यामुळे प्रदूषणाचा दुष्परिणामांपासून आपले संरक्षण होते . त्यासाठी कोणते प्राणायम आपण करायला हवेत ते बघूया.

- Advertisement -

अनुलोम-विलोम 

अनुलोम विलोम या प्राणायामामध्ये उजव्या नाकपुडीतून श्वास आत घेणे आणि डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडणे समाविष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यात तीच प्रक्रिया विरुद्ध बाजूने पुन्हा करावी .या प्राणायामामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते, तणाव कमी होतो आणि मन शांत होते. हे नियमित केल्याने फुफ्फुसे स्वच्छ होतात आणि प्रदूषित हवेचा प्रभाव कमी होतो.

- Advertisement -

कपालभाती प्राणायाम

या प्राणायामामध्ये पोट आतल्या बाजूने खेचले जाते आणि श्वास वेगाने बाहेर काढला जातो.या प्राणायामामुळे फुफ्फुसे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते आणि तणाव कमी होतो. हा प्राणायाम फुफ्फुसातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो आणि श्वसन प्रणाली निरोगी ठेवतो.

भ्रामरी प्राणायाम

या प्राणायाममध्ये दोन्ही कान अंगठ्याने बंद करून तोंडातून ‘मम’ उच्चारण करताना श्वास सोडला जातो. या प्राणायमाने मन शांत होते, तणाव कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. या प्राणायामामुळे प्रदूषणामुळे होणारी चिंता आणि अस्वस्थता कमी होण्यासही मदत होते.

शितली प्राणायाम
या प्राणायामामध्ये जीभेद्वारे हवा बाहेर काढून आत खेचली जाते.या प्राणायामाने शरीर थंड राहते आणि तहान कमी होते. या प्राणायामामुळे प्रदूषणामुळे होणारी घशाची जळजळ आणि खोकला कमी होण्यास मदत होते.

 

 

- Advertisment -

Manini