Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health प्रेग्नेन्सी मध्ये मनभरून खा ही चटणी, बाळ होईल healthy

प्रेग्नेन्सी मध्ये मनभरून खा ही चटणी, बाळ होईल healthy

Subscribe

आई होण्याचा अनुभव फार सुंदर असतो. पण पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. त्यावेळी असे काही फूड्स खावे लागतात जे बाळासह आईसाठी फार हेल्दी असतात. याच लिस्टमधील एक म्हणजे अशी एक चटणी जी प्रेग्नेंसी मध्ये तुम्ही मनभरुन खाऊ शकताच. पण याचा फायदा बाळाला सुद्धा होईल.

या चटणीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, फायबर, सोडियम, फॉस्फोरस, प्रोटीन, फोलेट, विटामिन सी सारखे पोषक तत्व असतात. नक्की कोणती आहे ही चटणी?

- Advertisement -

खरंतर नारळाची चटणी ही आरोग्यासाठी फार फायदेशीर मानली जाते. प्रेग्नेंसीमध्ये नारळाची चटणी खाल्ल्याने काही प्रकारे फायदा होतो. जर तुम्ही ती चटणी खाल्ली तर बाळाच्या विकासासाठी ही मदत मिळते. त्याचसोबत महिलेची नॉर्मल डिलिव्हरी होण्यास ही मदत होते असे म्हटले जाते.

- Advertisement -

प्रग्नेंसी दरम्यान जर तुम्ही सुक्या नारळाची चटणी खाल्ली तर यामुळे तुमची इम्युनिटी मजबूत होते. त्याचसोबत मॉर्निंग सिकनेसची समस्या ही दूर होते. या व्यतिरिक्त मळमळ वाटणे ही कमी होते. प्रेग्नेंसी दरम्यान खराब ब्लड फ्लो दरम्यान सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. अशातच जर तुम्ही नारळाची चटणी खाल्ल्यास तर तुमचा ब्लड फ्लो उत्तम राहतो आणि यामुळे सूज ही दूर होते.

प्रेग्नेंसीमध्ये नारळ किंवा त्याची चटणी खाल्ल्यास अॅसिडिटीची समस्या दूर होते. नारळात लोह भरपूर प्रमाणात असते. याच कारणास्तव नारळाचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता भासत नाही आणि अॅनिमियाच्या समस्येपासून तुम्ही दूर राहता. प्रेग्नेंसी मध्ये नारळाची चटणी खाल्ल्याने स्किन हेल्दी राहते. या व्यतिरिक्त त्वचेवरील डाग निघून जातात.


हेही वाचा- अंड आवडत नसेल तर ‘या’ पदार्थांचे करा सेवन

- Advertisment -

Manini