प्रेग्नेंसी दरम्यान आरोग्यासंबंधित फार काळजी घ्यावी लागते. याच कारणास्तव प्रेग्नेंट महिलांनी हलकी एक्सरसाइज करण्यासह आराम करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या दरम्यान काळजी न घेतल्यास गर्भवती महिला आणि मुलाच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. अशातच जर प्रेग्नेंसी दरम्यान एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल तर काही गोष्टींची काळजी जरुर घेतली पाहिजे. ट्रेन असो किंवा फ्लाइट तेव्हा काय काळजी घ्याल याच बद्दलच्या काही टीप्स जाणून घेऊयात. (Pregnancy health care during travel)
प्रेग्नेंट किती महिन्याचे आहात?
सर्वात प्रथम प्रवासाआधी तुम्ही किती महिन्याचे प्रेग्नेंट आहात हे पहा. कारण एअरलाइन्सच्या 34 आठवड्यांपेक्षा अधिक काळ प्रेग्नेंसीला झाला असेल तर तुम्हाला प्रवास करू दिला जात नाही.
महत्त्वाची औषधं सोबत ठेवा
प्रेग्नेंसीमध्ये प्रवास करताना आणि करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. एखाद्या प्रकारची समस्या येत असेल तर प्रवास करणे टाळा. गरज असेल तरच प्रवास करा आणि तेव्हा सोबत महत्त्वाची औषधं सुद्धा ठेवा.
खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत ठेवा
प्रेग्नेंसीमध्ये जेव्हा प्रवास करत असाल तर खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत ठेवा. यावेळी घरी बनवण्यात आलेले फूड्स खा. जेणेकरुन ते अगदी सुरक्षित आणि हेल्दी असतील.
कंम्फर्टेबल सीटची निवड करा
प्रेग्नेंसीदरम्यान विंडो सीट ऐवजी अशी सीट निवडा जेथे वॉशरुम जवळ असेल.
हेही वाचा- प्रेग्नेंसीदरम्यान महिलेला होते ब्रेनसंदर्भात समस्या