Sunday, December 3, 2023
घरमानिनीBeautyमजबूत केसांसाठी असा तयार करा हर्बल शॅम्पू

मजबूत केसांसाठी असा तयार करा हर्बल शॅम्पू

Subscribe

अलीकडच्या काळात केस गळतीची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बाजारातील केमिकलयुक्त उपकरण आणि अनियमीत आहारामुळे हळूहळू केस खराब आणि कमकुवत होऊ लागतात. या समस्येवर उपाय म्हणून आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी हर्बल शॅम्पू कसा बनवता येईल. हे सांगणार आहोत. हा हर्बल शैम्पू तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत बनवण्यास मदत करेल.

हर्बल शॅम्पू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

 • शिकाकाई
 • जास्वंदीची पाने
 • तुळशीची पाने
 • कोरफड
 • रीठा
 • सुकलेला आवळा

हर्बल शॅम्पू कसा बनवायचा?

Herbal Medicine: MedlinePlus

- Advertisement -
 • हर्बल शॅम्पू बनविण्यासाठी सर्वप्रथम शिककाई, रीठा आणि आवळा घ्या आणि या तीन गोष्टी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
 • दुसर्‍यादिवशी सकाळी या तिन्ही गोष्टी एका पातेल्यात पाण्यासोबत उकळत ठेवा.
 • काही वेळाने गॅस बंद करुन हे थंड होण्यासाठी ठेवा. आता रीठा सोलून त्यातील फेस काढून घ्या.
 • यानंतर, या सर्व गोष्टी ब्लेंडरमध्ये एकत्र करा आणि चांगले बारीक करा. नंतर चांगले गाळून बाटलीत काढा.
 • आता तुमच्या दाट केसांसाठी हर्बल शॅम्पू तयार आहे.
 • तुम्ही तुमच्या नेहमीच्या शॅम्पूच्या जागी हा तयार शॅम्पू वापरू शकता.

 


हेही वाचा :

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दररोज खा ‘हे’ ड्राय फ्रुट्स

- Advertisment -

Manini