Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल पंतप्रधान मोदींनी बांधणी प्रिंटची पगडी घालून केले ध्वजारोहण

पंतप्रधान मोदींनी बांधणी प्रिंटची पगडी घालून केले ध्वजारोहण

Subscribe

आजचा दिवस देशासाठी खूप खास आहे. वास्तविक, आज भारतातील अनेक लोक हे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर आणि अनेक शूर सैनिकांच्या हौतात्म्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी या दिवशी ध्वजारोहण केले जाते. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. यावेळी पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे भाषण होते.

पंतप्रधान मोदी प्रत्येक वेळी त्यांच्या दमदार भाषणाने तसेच त्यांच्या पेहराव आणि पगडीने देशवासीयांची मने जिंकतात. अशा परिस्थितीत पीएम मोदी आज राजस्थानच्या खास बांधणी डिझाइनचा पगडी घालून ध्वजारोहण करण्यासाठी आले होते. 2014 ते 2023 पर्यंत पीएम मोदींची पगडी किंवा साफा खूप चर्चेत आहे.

- Advertisement -

पीएम मोदींचा यंदाचा लूक हा सांस्कृतिक वारसा जपणारा आहे.

- Advertisement -

पीएम मोदींनी राजस्थानच्या खास बांधणी डिझाइनचा पगडी घातला आहे, ज्यामध्ये लाल, पिवळा, हिरवा असे अनेक रंग आहेत.

याशिवाय पीएम मोदींनी कॉलर आणि कफसह पांढऱ्या रंगाचा कुर्ता, चुरीदार पायजमा आणि ब्लॅक व्ही नेक जॅकेट घातले आहे.

अशातच त्यांच्या पगडीचा हा लूक खूपच क्लासी दिसत आहे.

रंगीबेरंगी अशी हि पगडी भारताचे नेतृत्व करणारी आहे.


हेही वाचा :

Independence Day 2023 : तिरंग्यातील अशोक चक्राचा रंग निळा का असतो? काय आहे महत्त्व?

- Advertisment -