मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा परिस्थिती ताणतणाव असणे सामान्य आहे. ते जास्त वाढल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. परीक्षेचा भ्यास व्यवस्थित व्हावा यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे टेन्शन मुलांना असणार हे स्वाभाविक आहे. मात्र काही सोप्या टिप्सद्वारे मुलांची ही तणावग्रस्त मानसिकता आपण बदलू शकतो. टेन्शन न घेता अभ्यास करण्यासाठी या गोष्टी फायद्याच्या ठरतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम सर्वपरिचित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यामातून देशभरातील अनेक विद्यार्थी मोदींना प्रश्न विचारतात आणि मोदी त्या कार्यक्रमात परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त सल्ला देतात. यावेळी मोदींनी
‘परीक्षा पे चर्चा’च्या सातव्या आवृत्तीत परीक्षा हॉलमधील ताण कसा कमी करायचा हे सांगितले होते. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये तणावात राहतात. पेपर मिळण्यापूर्वीच तो मनात शंभर गोष्टींचा विचार करू लागतो. परीक्षा हॉलमधील तणावामुळे कोणता अभ्यास केला हे लक्षातही येत नाही. परीक्षा देण्यापूर्वी तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताच या गोष्टी करा
या संदर्भात पंतप्रधानांनी मुलांना सल्ला दिला की, सर्वप्रथम परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शेवटपर्यंत पुस्तके घेऊन जाण्याची आणि शेवटपर्यंत वाचण्याची सवय टाळा. शेवटी पुस्तक बंद करा आणि काळजी करू नका. परीक्षा हॉल उघडताच आत प्रवेश करा आणि मिळेल त्या दहा-पंधरा मिनिटांत एकमेकांशी हलकेफुलके विनोद करा, बोला पण अभ्यासाविषयी चर्चा करू नका.
आधी संपूर्ण पेपर वाचा
पेपर हातात येताच प्रथम दहा मिनिटे काढून पूर्ण वाचून घ्या आणि त्या वेळी प्रत्येक विभागाला किती वेळ द्यायचा ते ठरवा. यामुळे शेवटी वेळेच्या अभावाची तक्रार करणारी मुले टाळतील. कोणत्या प्रश्नावर किंवा कोणत्या विभागात तुम्हाला किती वेळ घालवायचा आहे ते तुमच्या मनात ठरवा. हे तुम्हाला शेवटी तणावापासून वाचवेल.
पूर्व तयारी आवश्यक
परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर जो तयार नाही तो घाबरतो. म्हणूनच, परीक्षेच्या पहिल्या दिवशी अभ्यासासाठी जे काही तास सोडलेत त्यात लिहून सरावासाठी जास्तीत जास्त वेळ काढणे फार महत्वाचे आहे. जे लिहून सराव करतात त्यांची तयारी वेगळी असते. ते लिहा, वाचा आणि दुरुस्त करा, यामुळे तुमची तयारी निश्चित होईल. आयपॅड आणि मोबाईलच्या जमान्यात मुले लिहिणे विसरत आहेत आणि ही मोठी समस्या आहे.