फेब्रुवारी महिना प्रेमात पडलेल्या लोकांसाठी खूप खास असतो. वर्षभर अनेक जोडपी या महिन्याची आतुरतेने वाट पाहात असतात. व्हॅलेंटाइन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीपर्यत साजरा करण्यात येतो. आपला व्हॅलेंटाइन वीक कायम लक्षात राहावा यासाठी अनेक कपल्स विविध प्लॅन्स करतात. व्हॅलेंटाइन वीकच्या 5 व्या दिवशी प्रॉमिस डे साजरा करण्यात येतो. आज 11 फेब्रुवारी 2025 रोजी प्रॉमिस डे (Promise Day 2025) आहे. आज कित्येक कपल्स एकमेकांना प्रॉमिसेस देतात, ज्यामुळे दोन व्यक्तींमध्ये असलेले प्रेमाचे नाते आणखीन घट्ट होते. त्यामुळे आज आम्ही तुमचा यंदाचा प्रॉमिस डे खास होण्यासाठी तुम्ही कोणती प्रॉमिसेस पार्टनरला देऊ शकता, हे जाणून घ्या.
पार्टनरला देऊ शकता ही खास प्रॉमिसेस –
- पार्टनरला सुख-दु:खाच्या क्षणी साथ देईन असे प्रॉमिस देऊ शकता. या
- तुम्ही प्रॉमिस डे निमित्त पार्टनरसोबत कायम आनंदी आणि सदैव त्यांच्यासोबत राहण्याचे प्रॉमिस देऊ शकता.
- पार्टनरचा विश्वास कधीही तोडणार नाही , असे वचन देऊ शकता.
- पार्टनरसोबत कायम एकनिष्ठ राहील असे वचन प्रॉमिस डे निमित्त पार्टनरला देता येईल.
- तुम्ही प्रॉमिस डे निमित्त पार्टनरला त्याच्या भावनांचा आदर करेल असे वचन देऊ शकता.
प्रॉमिस डे ची सुरूवात कशी झाली –
प्रॉमिस डे संदर्भात एक कथा सांगितली जाते. या कथेनुसार, 1816 मध्ये राजकुमारी चार्लोटने तिच्या भावी पतीला प्रपोज केले होते. त्यानंतर त्यांच्यातील नाते आखणीन घट्ट होण्यासाठी त्यांनी एकमेकांना वचन दिली. त्यानंतर हळूहळू ही परंपर पुढे चालत आली आणि व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रॉमिस डे साजरा केला जाऊ लागला.
हेही पाहा –