Sunday, December 3, 2023
घरमानिनीHealthमार्केटमधून प्रोटीन पावडर खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

मार्केटमधून प्रोटीन पावडर खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Subscribe

सध्याच्या काळात बहुतांश लोक फिटनेस कॉन्शियस असतात आणि ते आपल्या डाएटमध्ये प्रोटीन पावडरचा जरुर समावेश करतात. खासकरून जी लोक वर्कआउट करतात. आपल्या बॉडीला शेप देण्यासाठी प्रोटीनचे अन्य सोर्स डाएटमध्ये वापरले जातातच. पण त्याचसोबत प्रोटीन पावडरचे सेवन सुद्धा करतात. खरंतर प्रोटीन पावडरचे सेवन करणे वाईट नाही. पण ज्या प्रोटीन पावडरचे सेवन करत असाल ती तुमच्या शरीराची गरज पूर्ण करू शकते.

सध्या मार्केटमध्ये काही प्रकारच्या ब्रँन्ड्सचे विविध प्रोटीन पावडर उपलब्ध असतात. त्यामुळे एक योग्य प्रोटीन पावडरची निवड करणे थोडे मुश्किल होते. काही वेळेस आपण चुकीच्या प्रोटीन पावडरचे सेवन केल्यास आपल्याला त्याचे रिजल्ट मिळत नाहीत. अशातच जाणून घेऊयात मार्केटमधून प्रोटीन पावडर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

- Advertisement -

आपल्या गोल्सवर फोकस करा
जेव्हा तुम्ही मार्केटमधून प्रोटीन पावडर खरेदी करता तेव्हा सर्वात प्रथम आपल्या गोल्सवर लक्ष दिले पाहिजे. खरंतर जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा मसल्स बिल्डअप करायचे असतील तर अशा सर्व गोष्टी लक्षात ठेवून प्रोटीन पावडर निवडावी.

प्रोटीनच्या टाइपवर लक्ष द्यावे
सध्या मार्केटमध्ये काही प्रकारचे प्रोटीन सप्लिमेंट उपलब्ध असतात. व्हे प्रोटीन सप्लिमेंट, कॅसीन प्रोटीन सप्लिमेंट, सोया प्रोटीन सप्लिमेंट, ब्राउन राइस प्रोटीन सप्लीमेंट असे काही. यामुळे तुम्ही ते खरेदी करताना प्रोटीनच्या टाइपकडे लक्ष द्यावे. खरंतर व्हे प्रोटीन शरीरात लवकर अब्जॉर्ब होते, त्यामुळे शरीराला एक रिकव्हरी सोर्स मिळतो. त्यामुळे व्हे प्रोटीने सेवन करणे वर्कआउटनंतर उत्तम मानले जाते. जर तुम्ही ते झोपताना घेत असाल तर त्यावेळी व्हे प्रोटीन घेतल्याने त्याचे फॅटमध्ये रुपांतर होईल. रात्रीच्या वेळी कॅसीन प्रोटीन घेणे उत्तम मानले जाते. त्यामुळे कोणत्या वेळी प्रोटीन पावडर घ्यायची हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.

- Advertisement -

Protein shakes for weight loss: Do they really work?

लेबल तपासून पहा
काही वेळेस असे होते की, केवळ प्रोटीन पावडरच्या बॉक्सवर व्हे प्रोटीन किंवा सोया प्रोटीन पाहून ते खरेदी केले जाते. पण असे कधीच करू नये. नेहमीच त्याच्या मागील लेबल वाचावा. प्रयत्न करा की, त्यात कोणत्याही प्रकारचे एडिटिव्स, फिलर्स किंवा आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केलेला नाही.

ब्रँन्ड आणि किंमतीवर लक्ष द्या
प्रोटीन पावडरचे सेव करताना तो ब्रँन्ड किंवा त्याच्या किंमतीवर खासकरून लक्ष द्यावे. जर ब्रँन्ड सर्टिफाइड असेल तरच खरेदी करा. कोणत्याही लोकल ब्रँन्डचे प्रोटीन पावडर खरेदी करू नये. तुम्ही प्रोटीन पावडरच्या किंमतीवर लक्ष द्या. जर तुम्हाला ते सातत्याने घ्यायचे असेल तर ते पॉकेट फ्रेंन्डली असणे सुद्धा गरजेचे आहे.


हेही वाचा- वयाच्या चाळीशीनंतर बेली फॅट असे करा कमी

- Advertisment -

Manini