आजकालच्या धकाधकीच्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेक शारीरिक आजार होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात पोषक घटकांची कमी असणे. यासाठी आपल्या रोजच्या आहारा प्रोटीन्सचा समावेश असणे आवश्यक आहे. प्रोटीनमुळे आरोग्य उत्तम राहून अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. साधारण: प्रोटीनचा उत्तम स्त्रोत म्हणून मांसाहारी पदार्थाकडे पाहिले जाते. पण, जर तुम्ही शुद्द शाकाहारी असाल तुम्ही अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत असणाऱ्या काही भाज्यांची यादी सांगणार आहोत, ज्याच्या सेवनाने शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघेल.
प्रोटीन्सचा स्त्रोत असणाऱ्या भाज्या –
पालक ( Spinach )
पालक या भाजीपासून अनेक पदार्थ बनवले जाते. पोषकतत्वांनी परिपूर्ण असणारी भाजी म्हणून पालकाकडे पाहिले जाते. पालकामध्ये प्रोटीनसह आयर्न मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही पालकाची भाजी, परोठे, सूप खायला हवे.
ब्रोकोली ( Broccoli )
ब्रोकोलीमध्ये प्रोटीन असते. याशिवाय ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
मशरुम ( Mashroom )
शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही मशरूमचे सेवन करू शकता. मशरूम थंड असल्याने शरीरातील उष्णता दूर होते. याशिवाय मशरूममधील प्रोटीनमुळे कॅन्सरशी लढण्यास मदत होते.
बटाटा ( Potato )
भारतीयांच्या जेवणात सरार्सपणे आढळणारी भाजी म्हणजे बटाटा. बटाटा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. बटाटा खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. मात्र, बटाट्याचे सेवन प्रमाणातच करावे.
मटार ( Green Peas )
हिवाळ्यात मिळणारी हंगामी भाजी म्हणजे मटार. मटारमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि अॅंटी-ऑक्सिडंट आढळतात. ज्यामुळे अल्झायमर, डायबिटीस आणि कॅन्सरसारखे आजार दूर राहतात.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde