घरलाईफस्टाईलनाश्ता : पंजाबी आलू पराठा

नाश्ता : पंजाबी आलू पराठा

Subscribe

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना किंवा सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास ‘पंजाबी आलू पराठा’ नक्की ट्राय करा.

साहित्य

  • ५ उकडलेले बटाटे
  • २ चमचे तेल
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • १ मोठा चमचा बडीशेप पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • १ चमचा जिरं पूड
  • १ चमचा धणे पूड
  • चिमूटभर हिंग
  • चिमूटभर हळद
  • २ चमचे तिखट
  • आमचूर पावडर
  • कोथिंबीर
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम बटाटी चांगली उकडून घ्यावी. त्यानंतर एका भांड्यात दोन चमचे तेल घालून त्यात आले-लसूण पेस्ट, बडीशेप पावडर, गरम मसाला, जिरं पूड, धणे पूड, हिंग, हळद आणि तिखट घालून चांगले एकजीव करुन घ्यावे. हा मसाला चांगला गरम झाल्यानंतर तो बटाट्यात एकत्र करुन घ्यावा. त्यानंतर त्यात आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालून चांगले मळून घ्यावे. त्यानंतर गव्हाच्या पोळीत सारण घालून पराठा लाठून घ्यावा. त्यानंतर एका पॅनमध्ये तूप घालून पराठा चांगला परतून घ्यावा, अशाप्रकारे गरमागरम पराठे तयार. हे पराठे आपण दही किंवा सॉससोबत खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -