Sunday, March 16, 2025
HomeमानिनीRacheal Kaur : मुलांसाठी रोज विमानाने अपडाऊन करणारी आई

Racheal Kaur : मुलांसाठी रोज विमानाने अपडाऊन करणारी आई

Subscribe

कोणत्याही महिलेसाठी, घर आणि ऑफिस एकाच वेळी सांभाळणे ही एक मोठी गोष्ट आहे. अनेकांना ही तारेवरची कसरत करणे खूप कठीण वाटतं. महिला यामुळे कंटाळतात आणि हार मानतात, परंतु काही महिला अशा असतात ज्या अडचणी सहन करतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या संकटावर मात करून पार पाडतात. अशाच एका जिद्दी आणि जगावेगळ्या महिलेची कहाणी आज आपण जाणून घेऊयात. संपूर्ण जग आता त्या महिलेला सुपर ट्रॅव्हलर म्हणून ओळखत आहे.

तसं पाहायला गेलं तर ऑफिसला जाण्यासाठी काही लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात तर काही खाजगी वाहनांचा वापर करतात. पण, तुम्ही कधी दैनंदिन प्रवासासाठी विमान वापरल्याचं ऐकलं आहे का? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल.पण हे खरे आहे. ही कहाणी आहे मलेशियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या रशेल कौरची. रशेल तिच्या दोन मुलांची काळजी घेण्यासाठी दररोज 600 किलोमीटर प्रवास करते. आता, कारने 600 किलोमीटर प्रवास करणे शक्य नाही, म्हणून रशेलला विमानाने प्रवास करावा लागतोय.

रशेल मलेशियातील पेनांग शहरात राहते आणि तिथून दररोज क्वालालंपूरला जाते. रशेल कौर एअर एशियामध्ये फायनान्स ऑपरेशन्स विभागात असिस्टंट मॅनेजर आहे. रशेल म्हणते की तिचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू होतो. तिला 9 वाजेपर्यंत तिच्या ऑफिसला पोहोचावे लागते. रशेल 5 वाजता घराबाहेर पडते. घरापासून विमानतळापर्यंत कारने प्रवास करते, ज्यासाठी तिला 50 मिनिटे लागतात. रशेल म्हणते की विमानाचे उड्डाण 6.30 वाजता होते आणि 40 मिनिटांत ती
क्वालालंपूरला पोहोचते. व 7.45 वाजता ती तिच्या ऑफिसला पोहोचते.

पूर्वी, रशेल आठवड्यातून फक्त एकदाच घरी यायची पण आता, मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी, ती दररोज पेनांग शहरापासून क्वालालंपूरपर्यंत 600 किलोमीटर प्रवास करते. रशेलला दोन मुले आहेत. एक 12 वर्षांचा आणि दुसरा 11 वर्षांचा आहे. रशेलच्या मते, मुले मोठी होत आहेत आणि त्यांना यावेळी त्यांच्या आईची गरज आहे.

तिच्या एका मुलाखतीत तिने सांगितले की ती दररोज मलेशियाहून सिंगापूरला विमान प्रवास करते आणि तिचे काम संपल्यानंतर ती तिच्या कुटुंबाकडे परत येते. तिच्या या प्रवासाबद्दल तिने दावा केला की ही केवळ स्वस्तच नाही तर तिला घरी मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी देखील देते, जी एका आईसाठी खूप महत्वाची आहे. तिच्या मुद्द्याबद्दल ती पुढे म्हणाली की मला 2 मुले आहेत आणि दोघेही मोठे झाले आहेत आणि मला वाटते की आईने मुलांच्या आसपास असले पाहिजे आणि मी हे करू शकते ही माझ्यासाठी खूप दिलासा देणारी गोष्ट आहे.

कौरने तिच्या मुलाखतीत सांगितले की, मी सुरुवातीपासूनच हे करत होते असे नाही, पूर्वी मी क्वालालंपूरमधील माझ्या ऑफिसमध्ये राहायचे, जे माझ्यासाठी खूप महाग होते आणि मी आठवड्यातून एकदाच माझ्या मुलांना भेटू शकत होते. त्यानंतर मी माझ्या घरून दररोज अप-डाऊन करण्याचा विचार केला.

रशेल मलेशियन कंपनी एअर एशियामध्ये काम करते. ती तिच्या प्रवासावर दररोज 11अमेरिकन डॉलर्स खर्च करते.
असं असलं तरी, दररोज प्रवास करूनही, राहेल पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करत आहे. तिच्या मते, क्वालालंपूरमध्ये राहत असताना तिला दरमहा भाड्यावर US$340 खर्च करावे लागत होते. पण आता तिला तिच्या प्रवासावर फक्त 226 अमेरिकन डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. राहेलच्या मते, ती बाहेर असताना तिला तिच्या जेवणावर दरमहा 135
अमेरिकन डॉलर्स खर्च करावे लागत होते. पण घरून दररोज ये-जा करण्यामुळे, जेवणाचा खर्चही कमी झाला आहे आणि तो दरमहा 68 अमेरिकन डॉलर्स इतका झाला आहे.

हेही वाचा : Health Tips : पिरियडस पेन वर करा हे उपाय


Edited By – Tanvi Gundaye

Manini