Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर लाईफस्टाईल Weight Loss Tips: पावसाळ्यात वजन कंट्रोल करायचयं, 'हा' डाइट प्लॅन फॉलो करा

Weight Loss Tips: पावसाळ्यात वजन कंट्रोल करायचयं, ‘हा’ डाइट प्लॅन फॉलो करा

Related Story

- Advertisement -

यंदा देशभरात मान्सूनला दमदार सुरुवात झाली आहे. या पावसाच्या दिवसांत अनेकांना तळलेल्या भज्या, मसालेदार स्नॅक्स, भाजलेला मक्का आणि विविध प्रकारचे पदार्थ खाण्यात रस असतो. लठ्ठपणाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनाही पावसात असे पदार्थ खाणे टाळता येत नाही. परंतु यामुळे लठ्ठपणा कमी होण्याऐवजी वाढू शकतो. लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी लोक विविध फंडा वापरत असतात. मात्र पावसाच्या दिवसांत लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध टिप्स वापरू नये. कारण या दिवसांत विविध विषाणूचा संसर्ग आणि आजारांच्या इंफेक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी या दिवसांत नेमका डाइट प्लॅन कसा असावा याची माहिती आम्ही तुम्हाला देतोयं. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकाशक्तीही वाढेल आणि वजनही नियंत्रणात राहिल. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोण-कोणत्या पदार्थ्यांचा समावेश असावा जाणून घेऊ…

नाश्त्यामध्ये ग्रीन टीचे सेवन करा

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर आहे, त्यामुळे दिवसाची सुरुवात चहाऐवजी ग्रीन टीने करा. कारण ग्रीन टी आपली चयापचय क्रिया सुधारण्याबरोबरचं वजन नियंत्रित ठेवते.

टोन दूध व मोड आलेले कडधान्य खा.

- Advertisement -

नाश्तामध्ये फुल क्रीम दुधा पिण्याऐवजी तुम्ही कमी कॅलरीस असलेले दूध म्हणजे टोनचे दूधाचे सेवन करा. तसेच मोड आलेल्या कडधान्याचाही नाश्त्यामध्ये समावेश करा. कारण मोड आलेले कडधान्य आपले वजन नियंत्रित ठेवण्याबरोबरचं पचन क्रिया नियंत्रणात ठेवते.

आहारात हंगामी भाज्यांचा समावेश करा

पावसाळ्यात उगवणाऱ्या हंगामी भाज्यांचा आहारात समावेश करा. या भाज्या तुम्ही वाफेवर भिजवून सलाटप्रमाणेही खाऊ शकता.

रात्री जेवनात हकला आहार खा

- Advertisement -

पावसाळ्याच्या दिवसांत रात्री जेवण हे हलके ठेवा. यासाठी आहारात व्हेज सूप, मूग डाळ, मिश्र भाज्यांचा समावेश करु शकता. विशेष म्हणजे पावसात रात्रीच्या जेवणासाठी जास्त उशीर होणार नाही यासाठी काळजी घ्या. कारण असे करत असाल पोटाची चरबी मोठ्याप्रमाणात वाढेल.

आहारात फळांचा समावेश करा

जेव्हा जेव्हा तुम्हाला फास्ट फूड खाण्याची क्रेविंग होईल त्यावेळी केळ्याचे सेवन करा. कारण केळ्यामध्ये असलेले घटक फास्ट फूड खाण्याची क्रेविंग दूर करतात. याशिवाय तुम्ही विविध प्रकारच्या हंगामी फळांचे सेवन करु शकता.

परंतु हा डाइट प्लॅन फॉलो करण्याआधी तुमच्या डॉक्टर, मेडिकल प्रोफेशनल किंवा डाइटिशियनचा सल्ला जरुर घ्या.


Mumbai Airport : अदानीने मुंबई विमानतळ ताब्यात घेताच मुख्यालय अहमदाबादला हलवले


 

- Advertisement -