बहिणी रक्षाबंधनाची आणि या दिवशी भावांकडून मिळणाऱ्या गिफ्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा 31 ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे भावांनो, तुम्ही देखील बहिणींना काही तरी स्पेशल गिफ्टस् देण्याचा प्लॅन करत असाल, आणि तुमचे बजेट नसेल तर अगदी 500 रुपयांत मिळणाऱ्या गिफ्ट्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. या गिफ्ट्सने तुम्ही बहिणींना खूश करालचं पण स्वत:चा खिसा सैल होण्यापासूनही वाचाल. नेमके हे गिफ्ट्स काय आहेत जाणून घेऊयात.
-स्लिंग बॅग
मुलींना छोट्या-छोट्या कामांसाठी बाहेर जाताना मोठी बॅग घेऊन जाणे आवडत नाही किंवा विचित्र वाटते. यात अनेक मुली मोबाईलच्या कव्हरमागे पैसे ठेवतात. त्यामुळे तुम्ही आपल्या बहिणीला एक छोटी स्लिंग बॅग भेट देऊ शकता. ज्यात पैसे आणि मोबाईल राहू शकतो. या बॅग अगदी 500 रुपयांच्या आत मिळतात. केवळ खरेदीसाठीच नाही तर इतर ठिकाणी देखील या बॅग सहज वापरू शकतो.
-ज्वेलरी बॉक्स
मुली आपल्या आवडीप्रमाणेचं ज्वेलरी घालणे पसंत करतात. त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनानिमित्त बहिणींना ज्वेलरी गिफ्ट न करता ही ज्वेलरी ठेवण्यासाठी एक फॅन्सी ज्वेलरी बॉक्स गिफ्ट करु शकता. हे ज्वेलरी बॉक्स अगदी 500 रुपयांत आरामात मिळतात. हे गिफ्ट बहिणींना आवडेल यात शंका नाही.
-शो पीस
जर तुमची बहिण ऑफिसमध्ये वर्क करत असेल तर तिला एक सुंदर शोपीस गिफ्ट करु शकता. ज्यातून ती ऑफिसमध्ये तिचे वर्क स्टेशन सजवू शकते. जेव्हाव्हा ते शो पिसचे गिफ्ट ती पाहेल तेव्हा नक्कीच तिला तुमची आठवण येईल.
-इंडोर प्लांट्स
जर तुमच्या बहिणींना झाडं लावण्याची आवड असेल तर तुम्ही तिला छोटे छोटे इंडोर प्लांट्सही गिफ्ट करु शकता. हे प्लांट्स अगदी घरात ठेवता येतील शिवाय ज्याची फार कमी काळजी घ्यावी लागेल.अशी सर्व प्रकारचे प्लांट्स तुम्हाला अगदी 500 रुपयांमध्ये मिळतील.
–लिपस्टिक
आजकाल अनेक कॉस्मॅटिक ब्रँड्सवर सेल सुरू आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला लिपस्टिकही गिफ्ट करू शकता. दोन वेगवेगळ्या रंगांच्या लिपस्टिक्स अगदी 500 रुपयांत तुम्हाला सहज मिळतील. या गिफ्टने तुमची बहिणी सर्वात जास्त खुश होईल, तसेच तुमचे कौतुकही करेल.
हेही वाचा- Raksha Bandhan 2023 : भावासाठी अशा राख्या कधीही घेऊ नका