घरलाईफस्टाईलराशीनुसार करा रक्षाबंधन, भावाला होईल लाभ

राशीनुसार करा रक्षाबंधन, भावाला होईल लाभ

Subscribe

श्रावण महिन्याची पौर्णिमा राखी पौर्णिमा या नावाने साजरी केली जाते. बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थातच रक्षाबंधन, यंदा २२ ऑगस्ट रोजी येत आहे. भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा हा सण. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग येत आहेत. आणि रक्षाबंधनसाठी हा काळ उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या दिवशी भावाला राखी बांधणे शुभ माणले जाते. मात्र, राशीनुसार भावाला राखी बांधल्ययास नाते अजून घट्ट होण्यास मदत होते. तर या रक्षाबंधनला भावाला कोणती राखी लक्की ठरेल? हे जाणुन घेऊया…

मेष
मेष राशीचा स्वामी मंगल आहे. तुमच्या भावाची रास जर मेष असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधा. ऊर्जेचा संचार करण्यास मदत करेल, असे सांगितले जाते.

- Advertisement -

वृषभ
वृषभ राशीचा शुक्र स्वामी मानला जातो. तर या वर्षी वृषभ रास असलेल्या तुमच्या भावाला लाल रंगाची राखी बांधा. लाल रंगाची राखी तुमच्या भावाला नक्कीच लाभदायक ठरेल,असे सांगितले जाते.

मिथुन
मिथुन राशीचा स्वामी बुध मानला जातो. मिथुन रासला हिरवा रंग फायदेशीर ठरू शकतो. भावाच्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यास ती लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जाते.

- Advertisement -

कर्क
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तुमच्या भावाची रास कर्क असेल, तर त्याला पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची राखी बांधवी. यामुळे भाऊरायाच्या जीवनात आनंदाचा गुणाकार होत राहील, असे सांगितले जाते.

सिंह
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तुमच्या भावाची रास सिंह असेल, तर त्याला केशरी किंवा सोनेरी रंगाची राखी बांधावी. भाऊरायाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी ती उपयुक्त ठरेल.असे सांगितले जाते.

धनु
धनु राशीचा स्वामी गुरू आहे. तुमच्या भावाची रास धनु असेल, तर त्याला केशरी व पिवळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख आणि शांतता आणण्यास ती उपयुक्त ठरेल, असे सांगितले जाते.

​मकर
मकर राशीचा स्वामी शनी आहे. तुमच्या भावाची रास मकर असेल, तर त्याला गडद निळा वा निळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. यामुळे भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक दृढ होईल, असे सांगितले जाते.

कुंभ
कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. तुमच्या भावाची रास जर कुंभ असल्यास त्याला राखाडी रंगाची राखी बांधा. भावासाठी खुप फायद्याचे ठरेल,असे सांगितले जाते.

मीन
मीन राशीचा स्वामी गुरू आहे. तुमच्या भावाची रास मीन असेल, तर त्याला केशरी व पिवळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख आणि शांतता आणण्यास ती उपयुक्त ठरेल, असे सांगितले जाते.

कन्या
कन्या राशीचा स्वामी बुध आहे. तुमच्या भावाची रास कन्या असेल, तर त्याला हिरव्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यास ती लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जाते.

वृश्चिक
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तुमच्या भावाची रास वृश्चिक असेल, तर त्याला लाल रंगाची राखी बांधावी. लाल रंगाची राखी भाऊरायाच्या जीवनात नवीन ऊर्जेचा संचार करण्यास मदत करेल, असे सांगितले जाते.

तुळ
तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तुमच्या भावाची रास वृषभ किंवा तुळ असेल, तर त्याला राखाडी रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भाऊरायाच्या जीवनात शुभ परिणाम आणण्यासाठी ती उपयुक्त ठरेल, असे सांगितले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -