Saturday, September 30, 2023
घर मानिनी Kitchen Recipe: रक्षाबंधनासाठी खास घरच्या घरी अशी बनवा काजू कतली

Recipe: रक्षाबंधनासाठी खास घरच्या घरी अशी बनवा काजू कतली

Subscribe

श्रावणचा महिना सुरु आहे. या महिन्यात गोडाचे पदार्थ हमखास बनवले जातात. मात्र येत्या 30 ऑगस्टला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. अशातच रक्षाबंधनासाठी खास अशी घरच्या घरी काजू कतली कशी बनवायची याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत.

- Advertisement -

साहित्य-
-250 ग्रॅम काजू
-250 ग्रॅम साखर
-240 ग्रॅम दूध
-चांदीचा वर्ख सजावटीसाठी

- Advertisement -

कृती-

काजू कतली तयार करण्यासाठी सर्वात प्रथम काजू मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता त्यात दूध टाकून व्यवस्थितीत मिक्स करा. हे मिश्रण गॅसवर धिम्या आचेवर ठेवा आणि त्यात साखर टाका. जो पर्यंत साखर विरघळत नाही तो पर्यंत ते मिश्रण ढवळत रहा. मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या. असे केल्यानंतर गॅसवरुन ते मिश्रण उतरवून थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर बटर पेपर किंवा तूप लावलेल्या एका प्लेटवर काढा आणि त्यावर चांदीचा वर्ख लावा. अशा प्रकारे तुमची काजू कतली तयार.


हेही वाचा- Shravan Recipes : श्रावणात बनवा स्पेशल ‘मालपोळी’

- Advertisment -

Manini