घरताज्या घडामोडीRakshaBandhan 2020: भावा- बहिणींच ठरलं! यंदा ऑनलाईन होणार रक्षाबंधन!

RakshaBandhan 2020: भावा- बहिणींच ठरलं! यंदा ऑनलाईन होणार रक्षाबंधन!

Subscribe

श्रावण महिन्याला सुरूवात झाली की हिंदू धर्मातील सण उत्सव यांना सुरुवात होते. गणपती, नागपंचमी , रक्षाबंधन असे अनेक सण या महिन्यात येतात. हे सण मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. रक्षाबंधन म्हंटल कि, इतर वेळी एकमेकांना भेटायलाही वेळ नसणारे भाऊ- बहीण त्या दिवशी मात्र आवर्जून एकमेकांच्या घरी जातात. बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला छानसं गिफ्ट देतो. पण हे चित्र आता बरचश्या घरात दिसणार नाहीये. या वर्षी कोरोना आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे भावा – बहिणींनी ऑनलाईनच रक्षाबंधन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

रक्षाबंधन

या कोरोनामुळे आता घरोघरो जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अनेक सोसायट्यांनी कडक नियम केले आहेत. या नियमांनुसार बाहेरील व्यक्तीस सोसायटीत येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जर बाहेरील व्यक्तीला सोसायटीत यायचे असल्यास त्या व्यक्तीने फिटनेस सर्टिफिकीट, आधार कार्ड, बरोबर आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीला १ तासाच्या वर सोसायटीत थांबता येणार नाही. या सारखे एकना अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता हे सर्व नियम बघता समस्त भावांनी ऑनलाईनच रक्षाबंद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -
रक्षाबंधन

ऑनलाईन गिफ्ट

आता ऑनलाईन रक्षाबंधन साजरी करणार म्हटल्यावर गिफ्टही ऑनलाईनच असणार. अनेक बहिणींनी राखी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या डिझाइन मध्ये खरेदी केल्या आहेत. तसेच अनेक भावांनी आपल्या बहिणीसाठी ऑनलाईन गिफ्ट खरेदी केले आहेत. त्यामुळे या वर्षी सणाचा जास्त भार ऑनलाईन इ कॉमर्स कंपन्यांच्या वेब साईट वर आहे. काही जणींनी ऑनलाईन च्या माध्यमातून भावाला राख्या पाठवल्या आहेत. तर अनेक जण बहिणीचे गिफ्ट कुरियर च्या माध्यमातून पाठवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -