जवळपास प्रत्येक भारतीय स्त्रीला साडी नेसायला आवडते. साडी नेसल्यावर प्रत्येक स्त्रीचे रूप अधिकच खुलते. परंतु काही महिलांसाठी मात्र सा़डी नेसणे कठीण काम असू शकते.
काही लोक साडी नेसणे जमत नसल्यामुळे साडी नेसणेच सोडून देतात. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर आता साडी नेसण्यापूर्वी अजिबात विचार करण्याची गरज नाही.
तसं पाहायला गेलं तर सध्या रेडी टू वेअर साड्या बाजारात उपलब्ध आहेत. या साड्या दिसायला आकर्षक असतात. सोबतच त्या नेसणे देखील खूप सोपे आहे. पदरापासून निऱ्यांपर्यंत या साड्या रेडीमेड उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही फक्त ड्रेस प्रमाणे या परिधान करु शकता आणि तुमचा लूक काही सेकंदातच तयार होतो. तरुण मुलींसाठी आणि पहिल्यांदाच साडी नेसणाऱ्यांसाठी या प्रकारच्या साड्या हा उत्तम पर्याय आहे. या लेखातून जाणून घेऊयात, साडी नेसण्यासाठी तयार असलेले लूक्स. ज्यातून तुम्ही स्टायलिंग टिप्स घेऊन स्वत:ला मॉडर्न लूक देऊ शकता.
विदाऊट प्लेटस् ची साडी :
जर तुम्हाला हळदी फंक्शनमध्ये काही आकर्षक लूक हवा असेल तर तुम्ही या प्रकारची पिवळ्या रंगाची साडी विदाऊट प्लेटस् कॅरी करू शकता. साडीच्या काठावर मॅचिंग रंगाच्या कापडाची लेस असते. ब्लाउजलाही अतिशय डिझायनर लूक देण्यात आला आहे. एका बाजूला कट स्लीव्हजसह प्लेन आणि दुस-या बाजूला वर्कसह चौथ्या बाही आहेत. ज्यामध्ये त्याच्या लूकला अतिशय आधुनिक टच मिळत आहे.
प्लेन रेडी टू वेअर साडी :
तरुण मुली एखाद्या खास प्रसंगी अशा प्लेन साडीसह हेवी वर्क ब्लाउज परिधान करुन स्वत:ला ग्लॅमरस लूक देऊ शकतात. त्यासोबत ऑक्सिडाईज्ड दागिन्यांची जोड द्या. तसेच सिल्व्हर हील्स तुमच्या लूकला कम्प्लिट बनवतील.
प्रिंटेड रेडी टू वेअर साडी:
प्रिंटेड रेडी टू वेअर साडीमध्ये तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. या साड्या धोती पॅटर्नमध्येही उपलब्ध आहेत. या साड्या पार्टीवेअर म्हणूनही बेस्ट ऑप्शन आहेत. सहजरित्या तुम्ही या कॅरी करू शकता.
हेही वाचा : Winter Fashion : हिवाळ्यात वुलन कुर्तीसोबत ट्राय करा या दुपट्टा डिझाईन्स
Edited By – Tanvi Gundaye