Friday, April 19, 2024
घरमानिनीRelationshipपतीच्या संपतीवर पत्नीचा अधिकार, कायदा काय सांगतो?

पतीच्या संपतीवर पत्नीचा अधिकार, कायदा काय सांगतो?

Subscribe

लग्न म्हणजे नवरा-बायकोचे आपुलकी, भावना, प्रेमाचे नाते. यामुळे दोन व्यक्ती एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देण्याची शपथ घेतात. पण काही वेळेस असे होते की, एखाद्या स्थितीमुळे किंवा काही अशा गोष्टींमुळे दोघांमध्ये वाद सुरु होतात आणि ते विभक्त होतात. पण जेव्हा ते दोघे विभक्त होतात तेव्हा दोन परिवार ही तुटतातच पण या व्यतिरिक्त काही गोष्टींवर ही परिणाम होतो. यापैकी एक म्हणजे प्रॉपर्टीमधील हिस्सा. रियल इस्टेट सर्वाधिक वॅल्युएबल असेट असून जी बहुतांश कपल्सकडे असते. पण याची वाटणी करणे खरंच मुश्किल असते. प्रॉपर्टीच्या वाटणीवरुन वर्षानु वर्ष केस लढली जाते

वैवाहिक आयुष्यात जेव्हा वाद सुरु होतात तेव्हा काही वाद हे कायद्याच्या कचाट्यात अडकले जातात. जसे की प्रॉपर्टीची वाटणी, मुलांची कस्टडी असे काही मुद्दे. पण आम्ही तुम्हाला घटस्फोटावेळी प्रॉपर्टी संदर्भातील नियम काय आहेत याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

-जर घटस्फोट तुमच्या सहमतीने झाला असेल आणि संपत्ती नवऱ्याच्या नावावर असेल तर पत्नीचा यावर काहीच अधिकार नाही.
-आजकल संपत्ती ही पती-पत्नीच्या संयुक्त नावे रजिस्ट्रेशन केली जाते. अशातच संपत्तीचे मालकी हक्क हे दोघांचे होतात. पण घटस्फोटानंतर सुद्धा संयुक्त संपत्तीवर पत्नीचा अधिकार असतो. पण अशा संपत्तीवर दावा करण्यापूर्वी तिने त्यासंबंधित काही पुरावे दाखवणे गरजेचे आहे.
-जर पत्नीचे खरेदीत योगदान नसेल आणि रजिस्ट्रेशनवेळी तिच्या नावाचा उल्लेख केला असेल तर संपत्तीत हिस्सा पत्नीला मिळू शकतो.
-अशा स्थितीत कपल म्युचुअल करार सुद्धा करु शकतात. दोघांपैकी ज्याला संपत्ती आपल्याकडे ठेवायची आहे तो ठेवू शकतो अथवा दुसरा पार्टनर खरेदी करु शकतो.
-जो पर्यंत कोर्टाकडून कायदेशीर रुपात दोघांना घटस्फोटाठी मानत्या देत नाही तो पर्यंत पत्नी आपल्या नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार दाखवु शकते.
-नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा हक्क असतो. जर नवऱ्याने मृ्त्युपूर्वी मृत्यूपत्र केले नसेल तर अशा संपत्तीवर ही पत्नीचा अधिकार असतो.


हेही वाचा- Separation Marriage नक्की काय? जपानमध्ये वाढतोय ट्रेंन्ड

- Advertisment -

Manini