अनेकांना सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला दिसतो. अगदी तासाभरानंतर चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि चेहरा नॉर्मल दिसू लागतो. अनेकांना चेहऱ्याला सूज येण्याचे कारण सौंदर्याशी निगडीत वाटते. पण कधी कधी बिघडलेले आरोग्य यामागे कारण असू शकते. बऱ्याचदा ही समस्या आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, लाइफस्टाइल आणि पचनसंस्थेच्या बिघाडामुळे उद्भवते. काही वेळा चेहऱ्याला सूज येण्याचे कारण रात्री झोपल्यावर पेशींमध्ये झालेला बदल असतो. पण, दरवेळी चेहऱ्यावर सूज येण्याचे कारण हेच असेल असे नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आजच्या लेखात जाणून घेऊयात सकाळी उठल्यावर चेहऱ्याला सूज येण्याची काही सामान्य कारणे
झोप – जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात झोप घेतल्याने चेहरा सुजलेला दिसतो.
खाण्यापिण्याच्या सवयी – रात्री तुम्हाला जर जास्त गोड खाण्याची सवय असेल किंवा पदार्थांमध्ये जास्त मीठ खाण्याची सवय असल्यास चेहऱ्याला सूज येऊ शकते.
एलर्जी – तुम्हाला एखाद्या प्रकारची ऍलर्जी असेल तर यामुळे चेहऱ्याला सूज येऊ शकते.
बिघडलेली पचरक्रिया – जर पचनक्रियेशी संबंधित समस्या असतील तर शरीरात पाणी साचून राहते. ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते.
विषारी पदार्थ – शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे पाणी साचते, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येते.
हृदयाच्या समस्या – हदयाच्या समस्यांमुळेही चेहऱ्यावर सूज येते.
मूत्रपिंडाशी संबंधित समस्या – शरीरातून टॉक्सिन आणि जास्त पाणी बाहेर टाकण्यासाठी किडनी आणि मूत्रपिंडाची महत्त्वाची भुमिका असते. एखाद्या कारणामुळे शरीरातील दूषित घटक शरीरातून बाहेर टाकले गेले नाही तर विषारी पदार्थ शरीरात राहतात. त्यामुळे चेहरा सूजलेला दिसतो.
खालील उपाय करता येतील –
- सूजलेल्या भागावर आइस पॅक लावावा.
- झोपताना डोके उंच राहील याची खात्री बाळगावी.
- आले, हळद, अननस यांसारखे दाहक विरोधी पदार्थांचे सेवन करावे.
हेही पाहा –