लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच पिझ्झाला लोकप्रिय फास्ट फूड मानले जाते. मात्र, पिझ्झाचा मैद्यापासून बनवला गेलेला बेस शरिरासाठी घातक ठरू शकतो. मैद्यामुळे शरिरात चरबी तयार होते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा पिझ्झा खूप आवडत असेल तर तुम्ही रव्याचा पिझ्झा नक्की ट्राय करा, जो तुमच्यासाठी पौष्टिक ठरेल.
साहित्य :
- 4 स्लाइस ब्राउन ब्रेड
- 1/2 कांदा
- 1/2 हिरवी शिमला मिरची
- 4 मोठे चमचे दही
- 1 कप रवा
- 1/2 टोमॅटो
- 1/2 छोटा चमचा काळी मिरची
- 2 मोठा चमचा ताजी क्रिम
- 1 मोठा चमचा वनस्पती तेल
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार मोजरेला चीज
कृती :
- सर्वप्रथम एका भांड्यात रवा, दही आणि ताजी क्रिम टाका. त्यानंतर त्यामध्ये काळी मिरची , मीठ टाकून हे सर्व जाड मिश्रण एकजीव करून घ्या.
- आता त्यात कापलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची एकत्र करा. हे मिश्रण थोडं घट्ट ठेवा.
- एका प्लेटवर ब्राउन ब्रेडचे तुकडे ठेवा आणि त्यावर सर्व तयार मिश्रण समप्रमाणात पसरवा.
- आता प्रत्येक स्लाइसवर 1-2 चमचे किसलेले मोझरेला चीज घाला.
- आता हे एका नॉन-स्टिक तव्यावर तेलाचे काही थेंब टाका. तव्यावर ज्या बाजूला ब्रेडचे तुकडे ठेवले आहेत. त्या बाजूला ब्रेडचे तुकडे ठेवा.
- हे तुकडे सोनेरी होईपर्यंक शिजवा. हे सर्व काप शिजल्यानंतर सॉस सोबत सर्व्ह करा.