घरलाईफस्टाईलreceipe- उरलेल्या पावभाजीपासून बनवा कटलेट आणि डोसा

receipe- उरलेल्या पावभाजीपासून बनवा कटलेट आणि डोसा

Subscribe

लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाव भाजी सगळ्यांनाच आवडते. कधी नाश्तासाठी पाव भाजी तर कधी लंच किंवा डिनरमध्येही पावभाजी खाल्ली जाते. आता तर बाजारात इंन्स्टंट पाव भाजीही मिळते. बनवायला सोपी आणि खाण्यास टेस्टी अशी ही पावभाजी कधी जास्त बनवली होते. तर कधी खाऊन शिल्लक उरते. मग अशावेळी थोडी कल्पकता वापरून पावभाजीपासून कटलेट किंवा सँडविचही बनवता येतात.

- Advertisement -

 

पावभाजीचे कटलेट

- Advertisement -

साहीत्य- ४ कप ब्रेड, दीड वाटी पावभाजी, १ चमचा गरम मसाला, २ चमचे पावभाजी मसाला,तळणासाठी तेल.

कृती-सर्वप्रथम गॅसवर मंद आचेवर तवा ठेवावा. त्यात दोन चमचे बटर टाकावे. त्यात ब्रेड कुरकुरीत परतून घ्यावे. ब्रेड थंड झाल्यावर त्याचा चुरा (क्रंब्स) करावा. हा चुरा एका बाऊलमध्ये ठेवावा. त्यानंतर उरलेल्या पावभाजीत गरम मसाला, पावभाजी , चवीनुसार मीठ टाका. भाजीचे गोळे बनवा. ते ब्रेडच्या चुरात टाका. नंतर फ्राय पॅनवर लालसर होईपर्यंत तळा. सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर खाण्यास द्या.

 

पावभाजी चीज डोसा

साहीत्य- उरलेली पावभाजी, डोशाचे पीठ चार वाटी, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक वाटी किसलेले चीज, अमूल बटर

 

कृती- सर्वप्रथम मंद आचेवर तवा ठेवावा. त्यावर उरलेली पावभाजी टाकावी. त्यावर कांदा, कोथिंबीर टाकून पसरावी. त्यावर बटर टाकावे. चीझ टाकून हा डोसा खरपूस फ्राय करावा. सॉस किंवा हिरवी चटणीबरोबर खाण्यास द्यावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -