Receipe : पौष्टिक आणि खमंग कच्च्या केळाची टिक्की नक्की ट्राय करा

आपण पिकलेले केळ खूप आवडीने खातो, पण तुम्हाला माहित आहे का, पिकलेल्या केळ्या इतकाच फायदा कच्चे केळ खाल्याने देखील होतो. अशावेळी तुम्ही कच्च्या केळाची टिक्की देखील ट्राय करू शकता.

कच्च्या केळ्याची टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

 • ६ कच्ची केळी
 • २ चमचा कॉर्न फ्लॉवर
 • ४ हिरव्या मिरच्या
 • १ चमचा लाल मिरची पावडर
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धा चमचा धना पावडर
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • अर्धा चमचा काळी मिरची
 • अर्धा चमचा तीळ
 • १ मोठा चमचा लींबाचा रस
 • मीठ चवीनुसार
 • तळण्यासाठी तेल
 • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :

 • सर्वप्रथम मध्यम आचेवर एका भांड्यात पाणी गरम करा, ते पाणी गरम होताच त्यात कच्चे केळ टाकून ते उकळून घ्या.
 • केळ नीट उकळल्यानंतर ते पाण्यातून काढून ठेवा.
 • त्यानंतर त्याची साल काढून ते मॅश करा.
 • आता एका भांड्या केळ्यासोबत लाल मिरची पावडर, कॉर्न फ्लॉवर, लिंबाचा रस, धना पावडर आणि गरम मसाला टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करा.
 • आता या मिश्रणाचे छोटे छोटो चपटे गोळे करा.
 • मध्यम आचेवर तेल गरम करून हे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
 • तयार कच्च्या केळाची टिक्की सॉस सोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून घ्या