Receipe : उपवासातील थकवा दूर करण्यासाठी पौष्टिक ‘मखाना खीर’ नक्की ट्राय करा

येत्या काही दिवसात श्रावणा महिना सुरू होईल. श्रावणात अनेकजण उपावास करतात. मात्र प्रत्येकवेळी उपावासात तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी शरीरासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी खीर तुम्ही नक्की बनवू शकता. आत्तापर्यंत तुम्ही उपवासात साबुदाण्याची खीर खाल्ली असेल. मात्र, यावेळी तुम्ही मखान्यांपासून बनवलेली खीर नक्की ट्राय करा.

मखाने खीरसाठी लागणारे साहित्य :

 • १ कप मखना
 • १ लिटर दूध
 • १/२ कप साखर
 • १ चमचा तूप
 • १ चमचा चारोळी
 • १ चमचा मनुका
 • १ चमचा वेलची पूड
 • १ लहान वाटी बारीक चिरलेले काजू, बदाम

कृती :

 • सर्वप्रथम मखाने बारीक बारीक चिरून मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या.
 • आता गॅसच्या मंद आचेवर तवा तापत ठेवा. तवा तापल्यानंतर तूप टाका.
 • आता त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मखाने १ मिनिट तळून घ्या.
 • एकीकडे दूध तापत ठेवा, दूधाला उकळी आली की त्यात हे मखाने टाका.
 • दूधात मखाने एकजीव होईपर्यंत मध्यम आचेवर दूध तापत ठेवा.
 • मात्र मधे मधे दूध मोठ्या चमचाने ढवळा.
 • आता त्यात साखर, बारीक चिरलेले काजू, बदाम, चारोळी, मनुका, वेलची पूड मिक्स करा.
 • साधारण ४ ते ५ मिनिटांनी गॅस बंद करा.
 • मखाने खीर सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :Receipe : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळ आलाय? मग या वेळी ‘उपवासाचा ढोकळा’ नक्की ट्राय करा