आपण पौष्टिक अशी मूगडाळीची किंवा मिक्स डाळींची खिचडी खातो. परंतु आज आपण बाजरीची खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत.
साहित्य
1 कप 5-6 तास भिजवून घेतलेली बाजरी
1/2 कप अर्धा तास भिजवून घेतलेली मुगडाळ
1 चमचा जीरे
2 मध्यम आकाराचे कांदे
1 चमचा आले लसूण पेस्ट
कृती-
प्रथम एक पातेले ठेवून ते पातेले गरम झाल्यावर त्यात 3 मोठे चमचे तेल घालून त्यात 1 चमचा जीरे घालून ते चांगले तडतडल्यावर 2 बारीक चिरून घेतलेले कांदे घालून ते चांगले परतून घ्या.आता 1चमचा आले लसूण पेस्ट घालून 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घालून चांगला परतून घ्यावा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. नंतर त्यात गोडा मसाला, लाल तिखट मसाला चांगला परतून, मग त्यात 1 छोटा चमचा हळद घालून सर्व मसाले व कांदा, टोमॅटो चांगले मऊ होऊ द्या. आता 5-6 तास भिजवून घेतलेली बाजरी, पुन्हा 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्यात मुगडाळ घालून चांगली मिक्स करून परतून घ्या. बाजरी बुडेल त्या पेक्षा थोडे जास्त पाणी घालून घाला. चवीनुसार मीठ घाला. नंतर खिचडीचे पातेले कुकर मध्ये ठेवून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्या. आता गॅस बंद करा.अशाप्रकारे सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम पौष्टिक बाजरीची खिचडी. या खिचडीवर साजूक तुपाची धार, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही खिचडी चांगली अतिशय सुंदर लागते.
हेही वाचा- Cutlet : नाश्त्यामध्ये बनवा मिक्स कडधान्याचे हेल्दी कटलेट