Tuesday, May 21, 2024
घरमानिनीRecipeRecipe : मिरचीचं झणझणीत लोणचं

Recipe : मिरचीचं झणझणीत लोणचं

Subscribe

उन्हाळ्यात आपण कैरी, लिंबाचे लोणचे बनवतो. आज आम्ही तुम्हाला मिरचीचे लोणचं कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1/2 किलो हिरवी मिरची
  • 1 वाटी मोहरीची डाळ
  • 1/4 चमचा मेथीची (कच्ची) पूड
  • 3/4 चमचा हळद
  • 1 चमचा हिंग
  • 2 वाट्या मीठ
  • 6 लिंबाचा (रस)
  • 1/2 वाटी तेल

कृती :

Green Chilli Pickle Mirch ka Achar

  • सर्वप्रथम एका ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद आणि हिंग घालावे आणि कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते ताटलीच्या पदार्थांवर ओतावे आणि झार्‍याने ढवळावे.
  • मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावे. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे.
  • त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा आणि बरणीत 2 चमचे मीठ घालावे.
  • त्यात मिरच्या आणि मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा.
  • अशाप्रकारे तुमचे मिरचीचे लोणचे भाकरीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : आवळ्याचं चटपटीत लोणचं

- Advertisment -

Manini