संध्याकाळच्या स्नॅकला खावे असा प्रश्न नेहमीच पडतो. अथवा कधीकधी चटकदार पदार्थ खावेत असे वाटते. अशातच आज आपण चटकदार शेंगदाण्याची रेसिपी पाहणार आहोत.
- Advertisement -
साहित्य-
शेंगदाणे, लिंबाचा रस, लाल तिखट, मीठ, जीरे, तीळ आणि सुकं खोबरे, किंचित साखर आणि तेल.
कृती-
शेंगदाणे भाजून त्याची सालं काढावीत. हे दाणे एका वाडग्यात घेऊन त्यावर लिंबाचा रस घालावा. त्यावर लाल तिखट आणि मीठ घालावे. हे सर्व थोडावेळ मुरवत ठेवा. कढईत थोडं तेल घालून त्यात जिरं, तीळ, सुक्या खोबऱ्याचा किस घालून चांगलं परतावे. त्यात मुरवत ठेवलेले दाणे घालावे आणि किंचित साखर घालून परतावे. अशा प्रकारे चटकदार शेंगदाणे तयार.
- Advertisement -
हेही वाचा- Recipe : कुरकुरीत कोथंबीरीच्या वड्या