सणासुदीला गोडाधोडाचे पदार्थ तयार केले जातात. अशातच त्यावेळी विविध ऑप्शन आपल्याकडे असतात. पण आज आपण एक वेगळा पदार्थ म्हणजे गूळ पापडीच्या वड्यांची रेसिपी पाहणार आहोत.
- Advertisement -
साहित्य-
4 वाट्या कणीक
साडे तीन वाट्या गूळ
वेलदोड्याची पूड
तूप
- Advertisement -
कृती-
एक वाटी तूप कढाईत घालावे. तूप चांगले तापले की 4 वाट्या कणीक घालावी. कणीक एकसारखी परतून खमंग भाजून घ्यावी. गुळात थोडं पाणी घालून पाक तयार करावा. त्यात वेलदोड्याची पूड टाकावी. त्यात भाजलेली कणीक टाकावी. उपड्या थाळीला तूप लावून घ्यावे. त्यावर हे मिश्रण ओतावे. एका वाटीच्या तळाला बाहेरून तूप लावून त्या वाटीने हे मिश्रण थापून एकसारखे करावे.
हेही वाचा- Narli Bhat Recipe : नारळी पौर्णिमेला का केला जातो नारळी भात? वाचा रेसिपी