Thursday, April 25, 2024
घरमानिनीKitchenRecipe: असा बनवा इंन्स्टंट Cup Pizza

Recipe: असा बनवा इंन्स्टंट Cup Pizza

Subscribe

पिज्जा म्हटलं की तोंडाला पाणी सुटते. विविध प्रकारचा पिज्जा खाण्यात ही फार मजा येते. पिज्जा वेज असो किंवा नॉन वेज तो आवडीने खाल्ला जातो. पण तुम्ही कधी कप पिज्जा खाल्ला आहे का? नाही, तर आम्ही तुम्हाला घरच्या घरी इंन्स्टंट कप पिज्जा कसा बनवायचा आहे याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

- Advertisement -
  • 2 चमचे बटर
  • 6 ब्रेडचे तुकडे
  • 1 टिस्पून बारीक चिरलेली लसूण
  • 2 टिस्पून बारीक चिरलेली पिवळी, लाल आणि हिरवी शिमला मिर्ची
  • 2 टिस्पून बारीक चिरलेला कांदा
  • 1/2 टिस्पून इटालियन सीजनिंग
  • 2 टिस्पून केचअप
  • 1/2 वाटी चीज

कृती-
ब्रेड हे लहान आकारात कापून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता एक पॅन घेत तो थोडा गरम झाल्यानंतर त्यात बटर टाका. आता लसूण त्या बटरमध्ये टाकून परतून घ्या. असे केल्यानंतर ब्रेडक्रम्ब्स टाकून व्यवस्थितीत भाजा. ब्रेडक्रम्ब्सचा रंग ब्राउन झाल्यानंतर गॅस बंद करता. आता एक प्लेट घेऊन त्यात तुम्ही घेतलेल्या भाज्या आणि अन्य साहित्य त्यात मिक्स करा.हे सर्व व्यवस्थितीत मिक्स केल्यानंतर एका कपमध्ये ते मिश्रण टाका आणि त्यावर चीज टाका. ही कृती केल्यानंतर अखेरीस ओवनमध्ये तुमचा पिज्जा बेक करण्यास ठेवा. असा तयार होईल तुमचा इंन्स्टंट कप पिज्जा.

- Advertisement -

हेही वाचा- सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ओट्स उपमा

- Advertisment -

Manini