बऱ्याचदा गोड पदार्थ म्हटला की, गोडाचा शिरा, शेवयाची खीर आणि रव्याची खीर असे पदार्थ केले जातात. मात्र, हे गोडाचे पदार्थ खाऊन नेहमी कंटाळा येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक हटके रेपिसी सांगणार आहोत.
साहित्य :
- 1 कप भिजवून घेतलेले तांदूळ
- 3 मोठे चमचे किसलेला गुळ
- 3 मोठे चमचे तूप
- 10-12 काजू आणि किसमिस
- 1/2 चमचा सुंठ आणि वेलची पावडर
- मीठ चिमुटभर
कृती :
- सर्वप्रथम एका नॉन स्टिक भांड्यात तूप थोडेसे गरम करा आणि त्यात काजू आणि किसमिसचे तुकडे परतून घ्या.
- त्यानंतर त्यावर तांदूळ घालून हलक्या हाताने परतून घेऊन त्यावर 2 कप पाणी घालून पुन्हा हलवून घ्या.
- आता त्यावर सुंठ आणि वेलची पावडर घालून एकजीव करून घ्या आणि उकळी आली की मंद आचेवर पाणी आटेपर्यंत ठेवा.
- हे अधून मधून हलवत रहा.
- पाणी आटलं की गुळाचा भात सर्व्ह करा.
हेही वाचा :