Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Recipe : झटपट बनवा पौष्टिक केळीचे काप

Recipe : झटपट बनवा पौष्टिक केळीचे काप

Subscribe

कच्या केळ्यापासून चविष्ट काप अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही घरी बनू शकता. तसेच कच्या केळ्याचे काप आरोग्याला देखील पोषक आहेत.

साहित्य :

 • 3 कच्ची केळी
 • 2 चमचा रवा
 • 1 चमचा तिखट
 • 1/4 चमचा हळद
 • 1/2 चमचा गरम मसाला
 • 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
 • मीठ (चवीनुसार)
 • जिरं
 • मोहरी

कृती  : 

 • सर्वात प्रथम केळी स्वच्छ धुवून घ्या.यानंतर याची साल काढून घ्या.
 • साल काढून झाल्यानंतर त्याचे गोलाकार काप करा. वर दिलेले साहित्य एकत्र करून त्याचे मिश्रण करून घ्या.
 • आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा.
 • गरम तेलात जिरं,मोहरी टाका.
 • यानंतर हे मिश्रण सगळ्या कापांना लावून घ्या.
 • आता गरम तेलात काप सोडा आणि छान तळून घ्या.
 • आता काप सर्व्ह सॉससोबत सर्व्ह करा.
- Advertisement -

 


- Advertisement -

हेही वाचा :

Recipe : उपवासात बनवा रताळ्याचा शिरा

- Advertisment -

Manini