नाश्तामध्ये अनेक विविध प्रकार असतात. मात्र, काही पदार्थांची तयारी ही आदल्या दिवसापासून करावी लागते. परंतु एखादा झटपट नाश्ता करायचा असल्यास अंडा पराठा ही बेस्ट अशी रेसिपी आहे.
साहित्य :
- दोन अंडी
- एक कांदा बारीक चिरलेला
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- एक कप कणीक (गव्हाचे पीठ)
- लाल तिखट
- चवीनुसार मीठ
- तेल आवश्यकतेनुसार
कृती :
- Advertisement -
- नेहमीप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी. त्या कणकेचे गोळे करून त्याचे फुलके करुन घ्यावे.
- आता एक फुलका पुन्हा तव्यावर टाकावा, थोडासा गरम झाला की उलटावा.
- दुसरीकडे एका वाटीत अंडी फोडून त्यात कांदा, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर घालून चांगलं फेटावं आणि ते मिश्रण त्या फुलक्याच्या गरम बाजूवर तेल लावल्यासारखं लावावे.
- आता त्यावर दुसरा फुलका दाबून बसवावा.
- अर्ध्या मिनीटाने फुलका हलक्या हाताने उलटलून त्याच्या बाजूने चमचाभर तेल सोडावं.
- तयार गरमा-गरम अंडा पराठ्याचा आस्वाद घ्या.
हेही वाचा :