Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenReceipe : शिळ्या भातापासून बनवा टेस्टी रेसिपी

Receipe : शिळ्या भातापासून बनवा टेस्टी रेसिपी

Subscribe

बऱ्याचदा शिळा भात राहतो. अशावेळी त्या भाताचे नेमके काय करावे? असा अनेकांना प्रश्न देखील पडतो. आज आम्ही शिळ्या भातापासून बनवली जाणारी अशीच एक खास रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

 • शिळा भात
 • 3-4 मिरच्या
 • 4-5 लसूण पाकळ्या
 • गरजेनुसार पाणी
 • मीठ
 • 2 चमचे तांदळाचे पीठ/ गव्हाचे पीठ
 • 1/4 चमचा जीरं
 • किसलेले गाजर
 • भोपळी मिरची
 • कोथिंबीर

कृती :

Bhaat Ka Thepla Recipe - Spiced Rice Paratha by Archana's Kitchen

- Advertisement -
 • सर्वप्रथम शिळा भात, मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
 • त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून त्याचे बॅटर बनवून घ्यावे.
 • त्यानंतर एका भांड्यात हे बॅटर घेऊन त्यात तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ, जीरं, किसलेले गाजर, भोपळी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यावे.
 • त्यानंतर पॅनला तेल लावून ते मिश्रण चांगले पसरवून घ्यावे.
 • अशाप्रकारे शिळ्या भातापासून बनवलेला हा नाश्ता तुम्ही सॉस किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता.

हेही वाचा :

Oats Pancake Receipe : सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक ओट्स पॅनकेक

- Advertisment -

Manini