दररोज सगळ्यांकडे नाश्त्यामध्ये अनेक विविध प्रकार असतात. मात्र, काही पदार्थांची तयारी ही आदल्या दिवसापासून करावी लागते. परंतु एखादा झटपट नाश्ता करायचा असल्यास अंडा सँडविच ही बेस्ट रेसिपी आहे.
साहित्य :
- Advertisement -
- 2 चमचा बटर
- 4 अंडी
- 4 ब्रेड
- 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- 1 बारीक चिरलेला कांदा
- 1 बारीक चिरलेला टोमॅटो
- 1/2 बारीक चिरलेली शिमला मिरची
- 1 चमचा बारीक कोथिंबीर
- आवश्यकतेनुसार मीठ
कृती :
- Advertisement -
- सर्वप्रथम गॅस वर एका पॅन ठेवा आणि त्यामध्ये एक चमचा तेल घाला.
- आता त्यामध्ये कांदा, मिरची परतून घ्या.
- त्यानंतर त्यात टोमॅटो आणि अर्धी चिरलेली शिमला मिरची घालून परतून घ्या.
- आता एका बाऊलमध्ये अंडी फोडून घ्या आणि त्यात मीठ टाकून फेटून घ्या.
- आता त्या कांदा-टोमॅटोच्या मिश्रणामध्ये फेटलेली अंडी मिक्स करून त्याची बुर्जी करून घ्या.
- आता दुसरीकडे एका ब्रेडवर बटर, रेड चिली सॉस लावून त्यावर बुर्जीचा थर पसरवून घ्या आणि त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा.
- आता ब्रेड सँडविच मेकरमध्ये भाजून घ्या.
- तयार बुर्जी सँडविच सर्व्ह करा.
हेही वाचा :