Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenRecipe : हिवाळ्यात बनवा गरमा गरम वाटाणा-काकडीचे सूप

Recipe : हिवाळ्यात बनवा गरमा गरम वाटाणा-काकडीचे सूप

Subscribe

सगळीकडेच आता थंडीमुळे गारवा जाणवू लागला आहे. थंडीच्या दिवसात विविध प्रकारचे सूप सुद्धा आवडीने बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला वाटाणा आणि काकडीने हेल्दी सूप कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 1 काकडी (बारीक चिरलेली)
 • 1 कप ओला हिरवा वाटाणा
 • 1 कप बारीक चिरलेला पातीचा कांदा
 • 4 कप भाज्यांचे सूप (व्हेजिटेबल स्टॉक)
 • 2 चमचे दही
 • 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
 • 1 चमचा काळी मिरी पावडर
 • 1 चमचा रेड चिली सॉस
 • चवीनुसार मीठ
 • गरजेनुसार पाणी

कृती :

Cucumber Gazpacho | FoodByMaria Recipes

 • सर्वप्रथम मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात कांदा लालसर परतून घ्या.
 • नंतर काकडी, वाटाणा शिजल्यानंतर त्यात व्हेजिटेबल स्टॉक टाका. उकळी येईपर्यंत गरम करा.
 • त्यानंतर त्यात काळी मिरी पावडर, मीठ टाका. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करा. ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढा.
 • त्यावर पाव चमचा दही, रेड सॉस टाका आणि गरमा गरम सर्व्ह करा.

हेही वाचा : Recipe : फळभाज्यांचे हेल्दी पराठे

- Advertisment -

Manini