दुधीची भाजी खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही दुधीचे थालिपीठ तयार करु शकता. थालिपीठ चवीला छान लागते आणि हे पौष्टिक देखील असते.
साहित्य :
- किसलेला दुधी
- 4-5 मिरच्या
- तांदळाचे पीठ
- आलं-लसूण पेस्ट
- जिरे
- तेल आवश्यकतेनुसार
- मीठ चवीनुसार
- Advertisement -
कृती :
- सर्वप्रथम किसलेल्या दुधीमधील पाणी काढून घ्या.
- त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ, मीठ, जिरे, बारीक वाटलेली मिरची, आलं-लसूण पेस्ट मिक्स करा.
- आता थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्या. आणि त्यावर तेल लावा.
- त्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर गोळे बनवून थालिपीठीप्रमाणे थापून घ्या.
- तव्यावर तेल सोडून थालिपीठ छान खरपूस भाजून घ्या.
- तयार गरमागरम दूधी थालिपीठ दह्यासोबत सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा :