Thursday, April 25, 2024
घरमानिनीKitchenRecipe : उपवासात बनवा रताळ्याचा शिरा

Recipe : उपवासात बनवा रताळ्याचा शिरा

Subscribe

उपवासाला फळे, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडा, रताळ्याचा किस वगैरे विशिष्ट पदार्थच तयार करत असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला खास उपवासासाठी रताळ्याचा शिरा कसा बनवायचा हे दाखवणार आहोत.

साहित्य : 

  • 1 मोठे रताळे
  • 2 चमचा तूप
  • 2 चमचा साखर
  • मीठ (आवश्यकते नुसार)
  • मिक्स ड्रायफ्रुट पावडर (आवश्यकते नुसार)

कृती : 

- Advertisement -
  • सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवून उकडून घ्यावे.
  • त्यानंतर त्याची साल काढून स्मॅश करावे.
  • आता एका गरम कढईत तूप घालून त्यात स्मॅश केलेल्या रताळ्याचा गर घालावा आणि छान परतून घ्यावा.
  • 3-4 मिनिट छान परतल्यानंतर त्यात साखर घालावी.
  • या मिश्रणात साखर विरघळल्यानंतर त्यावर ड्रायफ्रुट पावडर घालून पुन्हा परतावे.
  • 2-3 मिनिट परतून घेतल्यावर गॅस बंद करावा.
  • तयार रताळ्याचा शिरा सर्व्ह करावा.

 


हेही वाचा : Recipe : उपवासात बनवा शिंगाड्याचा शिरा

- Advertisment -

Manini