Recipe : रात्रीच्या उरलेल्या भाकरीपासून बनवा चविष्ट उपमा

बऱ्याचदा जेवणानंतर खूप भाकरी उरते. अशावेळी तुम्ही या भाकरीपासून सकाळचा हेल्दी नाश्ता तयार करू शकता. या उरलेल्या शिळ्या भाकरीपासून छान उपमा तयार करू शकता.

भाकरीपासून उपमा बनण्यासाठी लागणारे साहित्य :

 • उरलेली भाकरी
 • १ कांदा (बारीक चिरलेला)
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • १ चमचा मोहरी
 • १ चमचा जिरे
 • कोथिंबीर (बारीक चिरलेला)
 • कढीपत्ता
 • तेल आवश्यकतेनुसार
 • मीठ चवीनुसार

कृती :

 • सर्वप्रथम रात्री उरलेली भाकरी ५ मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवा.
 • ५ मिनिटानंतर भाकरी नरम झाल्यावर तिचे बारीक तुकडे करून घ्या.
 • आता भाकरीचे तुकडे मिक्सरमधून वाटून घ्या.
 • एकीकडे गॅसवर कढई तापत ठेवा.
 • तापलेल्या कढईत तेल टाका, तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, मिरची भाजून घ्या.
 • त्यानंतर त्यात थोडी हळद आणि बारीक केलेली भाकरी टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.
 • आता त्यात चवीनुसार मीठ टाकून ५-१० मिनिट छान परतून घ्या. परतलेल्या भाकरीवर कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

 


हेही वाचा :Receipe : उपवासातील थकवा दूर करण्यासाठी पौष्टिक ‘मखाना खीर’ नक्की ट्राय करा