Monday, December 2, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRecipeRecipe : रवा-उडदाची पौष्टिक इडली

Recipe : रवा-उडदाची पौष्टिक इडली

Subscribe

घरच्या घरी रवा आणि उडदाच्या डाळीपासून इडली कशी बनवायची हे आज आम्ही सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1/4 कप उडदाची डाळ
  • 3/4 कप रवा
  • मेथीचे दाणे
  • पाणी
  • मीठ चवीनुसार

कृती :

Veggie Rava Idli Recipe by Archana's Kitchen

  • सर्वप्रथम इडली बनवण्यासाठी एका वाटीत उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे घ्या. दुसऱ्या वाटीत रवा घ्या. आता इडली तयार करण्यासाठी 2 तास आधी उडदाची डाळ आणि रवा पाण्यात भिजवून ठेवा.
  • त्यानंतर मेथी आणि उडदाची डाळ मिक्सर ग्राउंडरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेला रवा उत्तपणे मिक्स करा.
  • हे सर्व मिश्रण एकत्र करताना मीठ टाका आणि एक पातळ बॅटर तयार करा.
  • अशा पद्धतीने इटलीचे बॅटर तयार होईल. आता तुम्ही हवं तर 4-5 तासांसाठी ते अधिक फर्मेंटेड होण्यासाठी ठेवा.
  • आता इडीलीच्या साच्याला तेल लावा. जेणेकरुन तुमचे बॅटर त्याला चिकटणार नाही. आता साच्यात बॅटर टाकून घ्या.
  • मोठ्या आचेवर 5-10 मिनिटांपर्यंत इटलीचे भांड व्यवस्थित बंद करुन इडली तयार होऊ द्या. काही मिनिटांनंतर तुमची इटली बनून तयार होईल.
  • तयार इडली नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा : Recipe : Yummy पनीर पॉपकॉर्न

- Advertisment -

Manini