Friday, March 1, 2024
घरमानिनीKitchenRecipe : पौष्टिक नाचणी-सोयाबीन वडी

Recipe : पौष्टिक नाचणी-सोयाबीन वडी

Subscribe

नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. यात अनेक महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर नाचणी खूपच उपयोगी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणी-सोयाबीनचा वडी कशी करतात हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 1/2 कप नाचणीचे पीठ
 • 1 कप सोयाबीनचे पीठ
 • 1/2 कप तूप
 • 1/4 कप जाड पोहे
 • 1/4 कप डिंक
 • 1/4 कप जाड किसलेलं सुकं खोबरं (कोरडे भाजून)
 • 1/2 चमचा वेलची पावडर
 • 3/4 कप गूळ (बारीक किसलेला किंवा चिरलेला)

कृती :

Nachni Satv / Ragi Pudding - YouTube

 • सर्वप्रथम कढईत तूप वितळवून त्यात पोहे आणि डिंक वेगवेगळे तळून घ्यावे.एका ताटात काढून थोडे चुरून घ्यावे.
 • आता त्याच तुपात नाचणीचे पीठ आणि कणिक मंद आचेवर भाजावी.
 • तूप घालून सुद्धा पीठ कोरडे दिसत असेल तर आणखी तूप घालावे.
 • किसलेला गूळ आणि 2-3 चमचे पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गुळ वितळवून घ्यावा.
 • ही कृती करताना सतत ढवळत राहावे. गूळ पूर्ण वितळला की आच मोठी करून एक उकळी येऊ द्यावी.
 • त्यात भाजलेले पीठ, डिंक, पोहे, भाजलेलं खोबरं, आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करावे.
 • हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतावे आणि त्याच्या वड्या पाडाव्यात.


हेही वाचा : 

Recipe : टेस्टी पेरूचा हलवा

- Advertisment -

Manini